Jaya Bachchan On Paparazzi: जया बच्चन सारख्या का चिडतात? अभिषेक बच्चनने सांगितलं या मागचं कारण,म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:45 AM2022-10-29T11:45:44+5:302022-10-29T12:04:23+5:30
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री आणि प्रसिद्ध राजकारणी जया बच्चन अनेकदा त्यांच्या रागामुळे चर्चेत असतात.
Jaya Bachchan On Paparazzi: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री आणि प्रसिद्ध राजकारणी जया बच्चन(Jaya Bachchan) अनेकदा त्यांच्या रागामुळे चर्चेत असतात. यामुळे त्या सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होताना दिसल्या आहेत. पुन्हा एकदा जया बच्चन अशाच काही कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. विमानतळावर अभिषेक बच्चनसोबत सेल्फी काढताना जया बच्चन चाहत्यांवर भडकल्या. आणखी एका व्हिडिओमध्ये त्या पापाराझींवर चिडलेल्या दिसल्या. अलिकडच त्या प्रतिक्षा या बंगल्याबाहेर त्या पापाराझी पाठलाग करताना दिसल्या.
का येतो जया बच्चन यांचा राग
जया बच्चन यांच्या या वागणं पाहून चाहतेसुद्धा हैराण झाले आहेत. जया बच्चन स्वत: सेलिब्रिटी असून कॅमेरामनवर का रागावतात असा प्रश्न लोकांना पडतो. एकदा अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी कॉफी विथ करण सीझन 6 मध्ये जया बच्चन यांच्या पापाराझींवर असलेल्या रागामागील कारण सांगितलं केलं होतं.
अभिषेक आणि श्वेताने केला होता खुलासा
कॉफी विथ करण सीझन 6 च्या एका एपिसोडमध्ये, अभिषेक आणि श्वेता या दोघांनी त्यांच्या आईला फोटोग्राफर्सना काय त्रास होतो आहे हे उघड केलं होतं. त्यांनी सांगितले की, जया यांना क्लॉस्ट्रोफोबिक आहे (ज्या व्यक्तीला एकटेपणा आवडतो) आणि म्हणून तिला तिच्या आजूबाजूला फोटोग्राफर्सची गर्दी आवडत नाही. श्वेताने खुलासा केला होता की, “तिच्या आजूबाजूला खूप लोक असतात तेव्हा ती खूप क्लॉस्ट्रोफोबिक बनते. जेव्हा लोक त्यांना न विचारता त्यांचे फोटो काढतात तेव्हा त्यांना ते आवडत नाही."
रेड कार्पेटवर आईच्या या वागण्यामुळे त्यालाही त्रास सहन करावा लागत असल्याचे अभिषेकने सांगितले. तो म्हणाला होता, "जर आम्ही चौघेही बाबा (अमिताभ बच्चन), ऐश्वर्या आणि मी रेड कार्पेटच्या आधी मनात प्रार्थना करतो आणि मग आम्ही निघतो, पण जर आमच्यासोबत श्वेता असेल तर आम्ही आईला तिच्यासोबत पाठवतो."