​अभिषेक बच्चनच्या हातून निसटले दोन मोठे सिनेमे...हे आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 09:43 AM2017-02-28T09:43:38+5:302017-02-28T15:13:38+5:30

बॉलिवूडमध्ये एखाद्याचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. वाईट दिवस सुरु झाले की, लोकांचे तुमच्याबद्दलचे मतही बदलते आणि मग नशीबही. ...

Abhishek Bachchan escapes from two big cinemas ... This is because! | ​अभिषेक बच्चनच्या हातून निसटले दोन मोठे सिनेमे...हे आहे कारण!

​अभिषेक बच्चनच्या हातून निसटले दोन मोठे सिनेमे...हे आहे कारण!

googlenewsNext
लिवूडमध्ये एखाद्याचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. वाईट दिवस सुरु झाले की, लोकांचे तुमच्याबद्दलचे मतही बदलते आणि मग नशीबही. मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याबाबतही असेच म्हणता येईल. ज्युनिअर बच्चनचे करिअर सध्या डामाडौल दिसतेय. कधीकाळी अभिषेकच्या करिअरने चांगला वेग घेतला होता. पण मग असा काही ब्रेक लागला की, आता अभिषेकच्या हातातले असले नसले सिनेमेही सटकू लागले आहेत. यश राज यांच्या ‘बंटी और बबली’ शिवाय ‘धूम’ सीरिजच्या तिन्ही चित्रपटात अभिषेक दिसला होता. आदित्य चोप्रा यालाही अभिषेक आवडायचा. पण मीडियाची बातमी मानाल तर, आदित्य चोप्राच्या दोन चित्रपटांमधून अभिषेक बच्चन बाहेर झालाय आणि याचे कारण दुसरे तिसरे काही नसून राणी मुखर्जी आहे.

होय, राणी मुखर्जी ‘हिचकी’ या चित्रपटातून कमबॅक करतेय, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. हा चित्रपट आधी अभिषेक करणार होता. पण आदित्य चोप्राची या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या यादीत एन्ट्री झाली अन् त्याने ‘हिचकी’तील लीड रोलसाठी राणीचे नाव समोर केले. आता राणी या चित्रपटात लीड रोल करणार म्हटल्यावर अभिषेक आऊट होणारच. (राणी व अभिषेक यांचे एकेकाळचे रिलेशन तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे. पण पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय. आता एकेकाळची जवळीक खूप मोठ्या दरीत बदलली आहे. त्यामुळे जिथे राणी तिथे अभिषेक शक्यच नाही.)केवळ राणीसाठी चित्रपटाची कथाही बदलली गेली. राणीला समोर ठेवून नव्याने चित्रपटाची पटकथा लिहिली गेली. ‘हिचकी’ शिवाय ‘धूम4’ही अभिषेकच्या हातून गेला. त्याची बातमी आम्ही तुम्हाला याआधी दिली आहेच.

Web Title: Abhishek Bachchan escapes from two big cinemas ... This is because!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.