अभिषेक बच्चनने ऐनवेळी दिला ‘धोका’! ‘पलटन’मधून घेतली माघार!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 10:15 AM2017-09-24T10:15:26+5:302017-09-24T15:45:26+5:30
‘बॉर्डर’सारखा सुपरडुपर हिट सिनेमा बनवणारे दिग्दर्शक जेपी दत्ता यांना अभिषेक बच्चन याने ऐनवेळी अडचणीत आणले आहे. होय, ज्युनिअर बच्चने ...
‘ ॉर्डर’सारखा सुपरडुपर हिट सिनेमा बनवणारे दिग्दर्शक जेपी दत्ता यांना अभिषेक बच्चन याने ऐनवेळी अडचणीत आणले आहे. होय, ज्युनिअर बच्चने का कुणास ठाऊक जे. पी. दत्ता यांच्या ‘पलटन‘ या मोस्ट अवेटेड चित्रपटाला नकार कळवला आहे. ‘पलटन’चा फर्स्ट लूक जारी झाला असताना, शिवाय चित्रपटाची संपूर्ण युनिट लडाखमध्ये पोहोचली असताना अभिषेकने या चित्रपटाला नकार कळवणे, सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. लडाखला रवाना होण्याच्या २४ तासांपूर्वी अभिषेकने या चित्रपटातून वॉकआऊट केले. अभिषेकच्या या नकारामागचे कारण जे. पी. दत्ता यांनाही कळेनासे झाले आहे.
जे. पी. दत्ता यांची मुलगी निधी दत्ता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिषेक बच्चन आता ‘पलटन’मध्ये नसेल. त्याने काही पर्सनल कारणांमुळे चित्रपटाला नकार कळवला आहे. आम्हा सर्वांसाठी ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. कारण आता ऐनवेळी आम्हाला त्याचा रिप्लेसमेंट शोधावा लागणार आहे. टीमची संपूर्ण टीम लडाखला पोहोचली आहे. आता लवकरात लवकर अभिषेकचा रिप्लेसमेंट शोधण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही, असे निधीने सांगितले.
अलीकडे या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले गेले होते. यात लष्करी अधिकाºयांच्या नावांचे बिल्ले टांगलेले दिसले होते. काही दिवसांपूर्वी स्वत: अभिषेकने अतिशय उत्साहात या चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र अचानक असे कुठले पर्सनल कारण आले, हे कुणालाच कळायला मार्ग नाही.
ALSO READ : अशी आहे ऐश्वर्या व अभिषेक बच्चनची लव्हस्टोरी...
जे. पी. दत्ता यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट एक युद्धकथा आहे. ६० च्या दशकातील भारत-चीन युद्धावर साकारणाºया या चित्रपटात सोनू सूद, पुलकित सम्राट, अर्जुन रामपाल, सुनील शेट्टी, जिम्मी शेरगिल व जॅकी श्रॉफ दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल जे. पी. दत्ता कमालीचे उत्सुक आहेत. लोकांना एक नवी कथा सांगण्याची वेळ आली आहे. ‘पलटन’मधून देशाच्या इतिहासाचा एक नवा अध्याय लोकांपुढे मांडला जाईल, असे जे. पी. दत्ता एका मुलाखतीत म्हणाले होते. अभिषेक बच्चने जे. पी. दत्ता यांच्या ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यात तो करिना कपूरसोबत दिसला होता.