अभिषेकवर अमिताभ बच्चन चिडतात का? खुलासा करत अभिनेता म्हणाला, "आई वडिलांना वाटतं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 16:18 IST2023-08-19T12:13:18+5:302023-08-19T16:18:15+5:30
अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच वडिलांबद्दल खुलासा केला आहे.

अभिषेकवर अमिताभ बच्चन चिडतात का? खुलासा करत अभिनेता म्हणाला, "आई वडिलांना वाटतं..."
अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) चा बहुचर्चित घूमर सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारत असून त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येते आणि जेव्हा तो पॅराप्लेजिक खेळाडूला ट्रेन करताना दिसतोय जी भूमिका अभिनेत्री सैयामी खेर साकारतेय. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिषेकने कोणतीच कसर सोडली नाही.
या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत अभिषेकनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील बरेच खुलासे केले. एका मुलाखतीत अभिषेक बच्चन याला विचारण्यात आले की, आताही अमिताभ बच्चन हे तुम्हाला ओरडतात का? यावर अभिषेक बच्चनने जे उत्तर दिलं तिचे सगळे कौतुक करतायेत.
अभिषेक म्हणाला, मुलं कितीही मोठी झाली तरही आई-वडिलांसाठी ती कायम लहानच असतात. त्यांना नेहमीच आपल्या मुलांची काळजी वाटत असते. आपली मुलं मोठी झाली असं त्यांना कधीच वाटत नाही. आणि माझ्या वडिलांच्याबाबत बोलायचे झाले तर ते मला कधीच ओरडत नाहीत. मी कधी तशी वेळेच येऊ दिली नाही. त्यांनी मला जोरात आवाज जरी दिला मी घाबरतो. माझ्या वडिलांनी आयुष्यामध्ये कधीच अजूनही माझ्यावर साधा हात देखील उचलला नाहीये. अभिषेक बच्चन हा पहिल्यांदाच वडिलांबद्दल खुलासा करताना दिसला आहे.
अलिकडेच अभिषेक घूमरच्या प्रमोशनच्या निमित्ताने कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर पोहोचला होता. शोमध्ये पोहोचताच अभिषेक बच्चनने सर्व नियम बदलले आणि स्वतः शोचा होस्ट बनत अमिताभ बच्चन यांना हॉट सीटवर बसवले होते. काही गमतीदार प्रश्न यावेळी त्याने वडिलांना विचारले होते.