'या' सिनेमात पुन्हा एकत्र दिसणार ऐश्वर्या-अभिषेक, अनुराग कश्यप करणार दिग्दर्शन...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 03:16 PM2020-12-17T15:16:09+5:302020-12-17T15:17:39+5:30

आता पुन्हा एकदा दोघे एका सिनेमात एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'गुलाब जामुन' आणि या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे अनुराग कश्यप.

Abhishek Bachchan speak up about come together with Aishwarya Rai Bachchan in Gulab Jamun | 'या' सिनेमात पुन्हा एकत्र दिसणार ऐश्वर्या-अभिषेक, अनुराग कश्यप करणार दिग्दर्शन...

'या' सिनेमात पुन्हा एकत्र दिसणार ऐश्वर्या-अभिषेक, अनुराग कश्यप करणार दिग्दर्शन...

googlenewsNext

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी बॉलिवूडमधील पती-पत्नीची सर्वात सुंदर जोडी आहे. दोघांना एकत्र मोठ्या पडद्यावर बघणं प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब असते. आतापर्यं दोघांनी ८ सिनेमात एकत्र काम केलंय. आता पुन्हा एकदा दोघे एका सिनेमात एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'गुलाब जामुन' आणि या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे अनुराग कश्यप.

आपल्या या आगामी प्रोजेक्टबाबत अभिषेक बच्चनने मोकळेपणाने सांगितले आहे. अभिषेकने एका पोर्टलसोबत बोलताना सांगितले की, 'मला नाही माहीत की, प्रोजेक्टसोबत काय झालंय. मनमर्जियामध्ये काम करताना चांगला वेळ गेला होता. मला त्या सिनेमावर गर्व आहे. मी पुन्हा त्याच्यासोबत(अनुराग कश्यप) काम करण्याची वाट बघत आहे'.

b

तेच पत्नी ऐश्वर्या रायसोबत काम करण्याबाबत अभिषेक म्हणाला की, 'तिच्यासोबत काम करण्यात मला नेहमी आनंद मिळतो. ती माझी फेवरेट को-स्टार आहे. जेव्हाही आम्ही सोबत काम करतो तेव्हा ती मला माझं बेस्ट काम देण्यास प्रेरित करते. आम्ही सोबत खरं काही चांगली कामे केली आहेत. मला आशा आहे की, आम्हाला दोघांना पुन्हा सोबत कास्ट केलं जाईल'.

सध्या अभिषेक त्याच्या आगामी 'बॉब बिस्वास'च्या शूटींगमध्ये बिझी आहे. याआधी तो नुकताच अनुराग बसुच्या 'लूडो' सिनेमात दिसला होता. यातील त्याच्या कामाचं भरभरून कौतुकही करण्यात आलं होतं. अभिषेक-ऐश्वर्याने याआधी कुछ ना कहो, गुरु, उमराव जान, धूम 2, ढाई अक्षर प्रेम के, रावण, हॅप्पी एनिवर्सरी, सरकार राज सारख्या सिनेमात एकत्र काम केलं आहे. 
 

Web Title: Abhishek Bachchan speak up about come together with Aishwarya Rai Bachchan in Gulab Jamun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.