Bob Biswas Trailer : अंगावर शहारा आणणारा ‘बॉब बिस्वास’चा ट्रेलर, अभिषेक बच्चनचा लुक पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 04:37 PM2021-11-19T16:37:10+5:302021-11-19T16:39:50+5:30

Bob Biswas Trailer : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘बॉब बिस्वास’ हा सिनेमा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे.

Abhishek Bachchan starrer movie Bob Biswas trailer out | Bob Biswas Trailer : अंगावर शहारा आणणारा ‘बॉब बिस्वास’चा ट्रेलर, अभिषेक बच्चनचा लुक पाहून थक्क व्हाल

Bob Biswas Trailer : अंगावर शहारा आणणारा ‘बॉब बिस्वास’चा ट्रेलर, अभिषेक बच्चनचा लुक पाहून थक्क व्हाल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ( Abhishek Bachchan) ‘बॉब बिस्वास’ हा सिनेमा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत (Bob Biswas Trailer) आहे. होय, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाये आणि या ट्रेलरमधील अभिषेकच्या लूकवर नेटकरी अक्षरश: फिदा आहेत.
2012 साली विद्या बालनचा ‘कहानी’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेलच आणि यातलं बॉब बिस्वासचं पात्रही तुम्हाला आठवतं असेलच. याच बॉब बिस्वासचा प्रवास ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. ‘कहानी’ चित्रपटात हे पात्र अभिनेता शाश्वत चॅटर्जीने साकारलं होतं. आता ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात हे पात्र अभिषेक जिवंत करणार आहे.

2 मिनिट 39 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये बॉब बिस्वास कोमामधून बाहेर येताना दिसतो. कोलकात्याचा कुप्रसिद्ध सुपारी किलर असलेला बॉब भूतकाळ विसरलेला असतो. यानंतर तो त्याच्या कुटुंबाला भेटतो. तो खरंच भूतकाळ विसरला असतो की त्यामागे काही रहस्य असतं, हे तर चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार आहे. पण ट्रेलरमधील अभिषेकचा  लूक जबरदस्त आहे. 
 त्याचा हटके लूक आणि जबरदस्त अभिनय पाहून   सोशल मीडियावर अभिषेकची प्रशंसा केली जात आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीये.
दिया अन्नपूर्णा घोषने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट केवळ ओटीटीवर रिलीज होणार आहे. 3 डिसेंबर 2001 ला झी 5 वर तो स्ट्रिम होणार आहे. 

Web Title: Abhishek Bachchan starrer movie Bob Biswas trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.