शाहरुखच्या सिनेमात व्हिलन बनणार बच्चन! 'किंग' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:17 AM2024-07-16T11:17:52+5:302024-07-16T11:18:21+5:30

शाहरुखच्या 'किंग' सिनेमात एका बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी लागली आहे. या सिनेमात खलनायिकाची एन्ट्री झाली आहे.

abhishek bachchan to play villain in shah rukh khan king movie | शाहरुखच्या सिनेमात व्हिलन बनणार बच्चन! 'किंग' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर

शाहरुखच्या सिनेमात व्हिलन बनणार बच्चन! 'किंग' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर

'पठाण', 'जवान', 'डंकी' या सिनेमांनंतर बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान 'किंग' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख सध्या या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. शाहरुखच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शाहरुखच्या किंग सिनेमात एका बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी लागली आहे. 

शाहरुखच्या 'किंग' सिनेमाबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमात शाहरुखबरोबर कोणते कलाकार दिसणार, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. शाहरुखच्या 'किंग' सिनेमात खलनायिकाची एन्ट्री झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चन व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. 'पीपिंगमून'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन किंग सिनेमात व्हिलन साकारणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने शाहरुख आणि अभिषेक पहिल्यांदाच आमनेसामने दिसणार आहेत. 

आत्तापर्यंत अभिषेक बच्चनला खलनायकाच्या भूमिकेत चाहत्यांनी पाहिलेलं नाही. त्याला हिरोच्या भूमिकेत बघणचं चाहत्यांनी पसंत केलं आहे. 'किंग' सिनेमाच्या निमित्ताने अभिषेक पहिल्यांदाच खलनायकाची इतकी मोठी आणि ताकदीची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमातून अभिषेकची एक वेगळी बाजू चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 

दरम्यान, शाहरुख खानच्या 'किंग' सिनेमात त्याची लेक सुहाना खानदेखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सुहानाने 'द आर्चिज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता हा तिचा दुसरा चित्रपट आहे. 'किंग' हा सिनेमा २०२५मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सुजॉय घोष या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर सिद्धार्थ आनंदची निर्मिती आहे. 
 

Web Title: abhishek bachchan to play villain in shah rukh khan king movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.