'भर कार्यक्रमात मला पहिल्या रांगेतून उठवलं आणि..'; मोठ्या स्टारसमोर अभिषेकला मिळाली अपमानास्पद वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 02:40 PM2021-12-20T14:40:00+5:302021-12-20T14:40:00+5:30

Abhishek Bachchan: एक स्टार किड असूनही त्याला कलाविश्वात मोठा स्ट्रगल करावा लागला. विशेष म्हणजे उत्तम अभिनय केल्यानंतरही त्याच्या कामाचं कौतुक न झाल्याचं पाहायला मिळालं.

abhishek bachchan was insulted in public he was asked to vacate the front row seat for a bigger star | 'भर कार्यक्रमात मला पहिल्या रांगेतून उठवलं आणि..'; मोठ्या स्टारसमोर अभिषेकला मिळाली अपमानास्पद वागणूक

'भर कार्यक्रमात मला पहिल्या रांगेतून उठवलं आणि..'; मोठ्या स्टारसमोर अभिषेकला मिळाली अपमानास्पद वागणूक

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या लोकप्रियतेविषयी आणि त्याच्या कारकिर्दीविषयी कोणत्याही व्यक्तीला काही नवीन सांगायची गरज नाही. या दिग्गज अभिनेत्याच्या नावाचा डंका सातासमुद्रापारपर्यंत पोहोचला आहे. मात्र, त्याच्या इतकी लोकप्रियता किंवा यश त्यांचा लेक, अभिनेता अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan)  वाट्याला आलं नाही. एक स्टार किड असूनही त्याला कलाविश्वात मोठा स्ट्रगल करावा लागला. विशेष म्हणजे उत्तम अभिनय केल्यानंतरही त्याच्या कामाचं कौतुक न झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच अभिषेकने एक किस्सा शेअर केला आहे. यात त्याला कशाप्रकारे अपमानास्पद वागणूक मिळाली हे त्याने सांगितलं आहे.

अनेक चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता

अलिकडेच अभिषेकने त्याला कशा प्रकारे अपमानास्पद वागणूक मिळालं याची काही उदाहरणं दिली आहेत. अगदी चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यापासून ते भर कार्यक्रमात पहिल्या रांगेतून उठवण्यापर्यंत त्याला अनेकदा अपमान सहन करावा लागला. "एकदा मला एका चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आणि त्यामागचं कारणही मला देण्यात आलं नाही. ज्यावेळी मी सेटवर पोहोचलो त्यावेळी पाहिलं की माझ्या जागी दुसराच एक अभिनेता माझा रोल करतोय. हे दृश्य पाहिल्यावर मी तेथून निघून गेलो. मला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं आणि इतकंच कशाला अनेक जण माझा फोनही उचलत नव्हते. मला वाटतं हे सगळं नॉर्मल आहे. प्रत्येक कलाकाराला या गोष्टींना सामोरं जावं लागतं. माझे वडीलही यातून गेले आहेत", असं अभिषेक म्हणाला.

पहिल्या रांगेतूनही उठवलं

माझ्यासोबत असंही घडलंय जेव्हा मला पहिल्या रांगेतून उठवून मागे बसायला सांगितलं.  एकदा मी एका कार्यक्रमात गेलो होतो. यावेळी तुम्ही पहिल्या रांगेत बसा असं मला सांगण्यात आलं. पण, त्याचवेळी एक मोठा स्टार आल्यामुळे मला जागेवरुन उठवून मागे बसायला सांगितलं, असं अभिषेक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "पण हे सगळं शोबिजचा भाग आहे. त्यामुळे ते तुम्ही फारसं मनावर घेऊ शकत नाही. पण तुम्ही एक नक्कीच करु शकता. घरी येऊन झोपण्यापूर्वी एक निर्धार करा की मी अजून मेहनत करेन. ज्यामुळे मला परत कधीच पुढच्या रांगेतून उठवणार नाहीत."

दरम्यान, अभिषेकने बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिषेक 'रेफ्युजी', 'कुछ ना कहो', 'बंटी और बबली', 'धूम', 'द बिग बुल', 'लूडो' , 'मनमर्जियां'मध्ये झळकला आहे. तसंच लवकरच तो 'बॉब बिस्वास'च्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: abhishek bachchan was insulted in public he was asked to vacate the front row seat for a bigger star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.