'स्त्री 2' च्या यशाचं श्रेय कोणाला? अपारशक्तीनंतर अभिषेक बॅनर्जीनेही मांडलं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 11:43 AM2024-08-27T11:43:14+5:302024-08-27T11:43:53+5:30
'स्त्री 2' एकीकडे तुफान यश मिळवत आहे दुसरीकडे पडद्यामागे वाद सुरु आहे.
सध्या 'स्त्री 2' (Stree 2) सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. एका आठवड्यातच सिनेमाने ३०० कोटी पार कमाई केली आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी यांची सिनेमा मुख्य भूमिका आहे. मात्र सिनेमाच्या यशाचं सगळंच श्रेय श्रद्धा कपूरला मिळत असल्याने अनेकांनी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली. अपारशक्तीने सुद्धा यावर भाष्य केलं होतं. आता अभिषेक बॅनर्जीने (Abhishek Banerjee) यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'स्त्री 2' एकीकडे तुफान यश मिळवत आहे दुसरीकडे पडद्यामागे वाद सुरु आहे. सिनेमाच्या यशाचं श्रेय कोणाला द्यायला हवं याची चर्चा सुरु आहे. अपारशक्ती खुरानानंतर अभिषेक बॅनर्जीने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "मला पीआर गेम कळत नाही. सोशल मीडियावरच्या चर्चाही कळत नाही. जेव्हा एखादी गोष्ट हिट होते तेव्हा काही ना काही निगेटिव्ह गोष्टीही समोर येतात. पण त्यावर फारसं दिलं जाऊ नये."
तो पुढे म्हणाला, "जेव्हा आम्ही सिनेमा साईन तेव्हा आम्ही असं म्हणलो नाही की हा सिनेमा याचा आहे की त्याचा. तुम्हीही पाहिलं आहे की जनाच्या एन्ट्रीला सिनेमागृहात सर्वात जास्त टाळ्या वाजतात. एवढ्या मोठ्या कलाकारांमध्ये जना आहे तरी कोण? सिनेमात कलाकारांची टोळी आहे. हा सर्वांचा सिनेमा आहे आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. बाकी गोष्टी बोलून काही उपयोग नाही. हा सिनेमा अमर कौशिकचा आहे. तुम्हीही कितीही वाद घाला काही फायदा नाही. दिग्दर्शकच जहाजाचा कॅप्टन असतो. त्याच्यामुळेच कोणताही सिनेमा चांगला दिसतो. कारण तो टीमला जोडून ठेवतो. स्त्री २ सर्वांचा सिनेमा आहे. प्रत्येकाच्या मेहनतीतून सिनेमा बनला आहे. त्यामुळे वाद घालायचा प्रश्नच येत नाही. "
अभिषेतक बॅनर्जीने सिनेमात 'जना' ही भूमिका साकारली आहे. याकील सर्वांची कलाकारांचं कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे. अजूनही प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी होत आहे.