'सनम तेरी कसम' मधील सरुच्या भूमिकेसाठी २१५ मुलींनी दिलेल्या ऑडिशन्स; 'या' कारणामुळे मावरा होकेनची झाली निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:41 IST2025-02-10T17:38:08+5:302025-02-10T17:41:55+5:30
राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित 'सनम तेरी कसम' चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळतोय.

'सनम तेरी कसम' मधील सरुच्या भूमिकेसाठी २१५ मुलींनी दिलेल्या ऑडिशन्स; 'या' कारणामुळे मावरा होकेनची झाली निवड
Sanam Teri kasam : राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळतोय. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आला. आता 'सनम तेरी कसम' हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक बनला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन आणि हर्षवर्धन राणे (Harshwardhan Rane) या कलाकारांनी चित्रपटात मुख्य भूमिका आहे. हर्षवर्धनने साकारलेला इंदर पात्र मावरा होकेनचं (Mawra Hocane) सुरु हे पात्राने सिनेरसिकांच्या मनात घर केलं. दरम्यान, या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. परंतु चित्रपटात मावराची निवड करण्यापूर्वी निर्मात्यांनी सरुच्या भूमिकेसाठी २१५ मुलींचे ऑडिशन घेतले होते.
दरम्यान, सोशल मीडियावर मावरा होकेनचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये चक्क अभिनेत्रीने स्वत: तिच्या कास्टिंगचा किस्सा शेअर केला होता. त्यावेळी अभिनेत्रीने "मला सांगण्यात आलं होतं की या भूमिकेसाठी सुमारे २१५ मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. परंतु सरुच्या भूमिकेसाठी कोणाचीही निवड झाली नाही. कारणं चित्रपटात बरेच इमोशनल सीन असल्यामुळे त्यांना त्या भूमिकेला साजेसा चेहरा पाहिजे होता." शेवटी या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली. असा खुलासा अभिनेत्रीने केला.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर 'सनम तेरी कसम' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतो आहे. २०१६ साली आलेला हा रोमँटिक हिंदी सिनेमा आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. दरम्यान, 'सनम तेरी कसम' मध्ये हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेनसह मनीष चौधरी, मुरली शर्मा, अनुराग सिन्हा, विजय राज, सुदेश बेरी, कमल आदिब हे अनुभवी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते.