"शाहरुख सरांना आमचा सलाम सांग!" पापाराझींनी घेतली अबरामची फिरकी, किंग खानच्या लेकाने दिलं 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:44 AM2024-10-21T10:44:31+5:302024-10-21T10:47:22+5:30

शाहरुखचा लेक अबरामची पापाराझींनी चांगलीच फिरकी घेतल्यावर किंग खानच्या लेकाने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे (shahrukh khan, abram khan)

abram khan video goes viral when paparazi make fun with abram and shahrukh khan | "शाहरुख सरांना आमचा सलाम सांग!" पापाराझींनी घेतली अबरामची फिरकी, किंग खानच्या लेकाने दिलं 'हे' उत्तर

"शाहरुख सरांना आमचा सलाम सांग!" पापाराझींनी घेतली अबरामची फिरकी, किंग खानच्या लेकाने दिलं 'हे' उत्तर

शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत असतं. शाहरुख खान आणि त्याची मुलंही मीडियाशी संवाद साधताना दिसतात. शाहरुखची लेक सुहाना खानने मनोरंजन विश्वात पदार्पण केलंय. शाहरुखचा मोठा लेक आर्यन खानही दिग्दर्शनात पदार्पण करतोय. याशिवाय 'द लायन किंग' सिनेमात आर्यनने सिंबाला आवाज दिला होता. सध्या मीडियामध्ये शाहरुखचा धाकटा लेक अबराम खानची चर्चा आहे. अबरामला पापाराझींनी घेरलं असताना त्याच्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलंय.

अबरामची पापाराझींनी घेतली फिरकी

विरल भयानीने अबरामचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत शाहरुखचा धाकटा लेक अबराम खान पाहायला मिळतो. अबराम गाडीत बसतो. तेव्हा पापाराझी त्याच्याशी प्रेमाने संवाद साधून त्याला निरोप देतात. अबरामही पापाराझींना "बाय" म्हणत निरोप देतो. शेवटी अबरामला निरोप देताना पापाराझींनी त्याला एक खास विनंती केली. "शाहरुख सरांना आमचा सलाम सांगा" असं पापाराझी म्हणाले तोच अबरामने नम्रपणे मान डोलावली. अबरामच्या या छोट्याश्या प्रतिक्रियेने सर्वांचं मन जिंकलंय. 


अबराम आणि शाहरुख पहिल्यांदाच एकत्र

अनेकांना माहित नसेल पण अबराम आणि शाहरुख एकाच सिनेमात झळकणार आहेत. हे दोघे एकत्र अभिनय करताना दिसणार नाहीत. तर एका अ‍ॅनिमेटेड सिनेमात त्यांनी आवाज दिलंय. 'मुफासा द लायन किंग' या आगामी अ‍ॅनिमेटेड सिनेमासाठी अबराम, शाहरुख, आर्यन हे खान कुटुंब एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांना वडील-मुलाच्या आवाजाची जादू काय कमाल करते, याची उत्सुकता आहे.

Web Title: abram khan video goes viral when paparazi make fun with abram and shahrukh khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.