'उन्हे जलने दिया गया और..'; 'गोध्रा'चा टिझर रिलीज, Bigg Boss OTT 3 मधील अभिनेता प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 01:27 PM2024-06-25T13:27:11+5:302024-06-25T13:27:47+5:30

'गोध्रा' सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. या टिझरमध्ये साबरमती एक्सप्रेस हल्ल्यावर परखडपणे भाष्य करण्यात आलंय (godhra)

Accident Or Conspiracy GODHRA Official Trailer bigg boss ott 3 fame Ranvir Shorey | 'उन्हे जलने दिया गया और..'; 'गोध्रा'चा टिझर रिलीज, Bigg Boss OTT 3 मधील अभिनेता प्रमुख भूमिकेत

'उन्हे जलने दिया गया और..'; 'गोध्रा'चा टिझर रिलीज, Bigg Boss OTT 3 मधील अभिनेता प्रमुख भूमिकेत

२७ फेब्रुवारी २००२ ची साबरमती एक्सप्रेस गोध्रा जंक्शनजवळ अडवण्यात आली. पुढे हल्लेखोरांनी एक्सप्रेसचे डबे जाळले. अनेक माणसं या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडली. २२ वर्ष झाली तरीही अजूनही गुजरातमधील जनतेच्या मनात या वेदनेची सल कायम आहे. याच भीषण घटनेवर आधारीत Accident Or Conspiracy GODHRA सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. Bigg Boss OTT 3 फेम अभिनेता रणवीर शोरे सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकतोय

Accident Or Conspiracy GODHRA सिनेमाचा टिझर

गेल्या काही दिवसांपासून Accident Or Conspiracy GODHRA सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. आता नुकतंच या सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. टिझरमध्ये ज्वलंत विषय आणि संवाद पाहायला मिळत आहेत. 'साबरमती ट्रेन को जलाया नही गया सर उनको जलने दिया गया', 'गलती से उस ट्रेन में आग लग गयी तो फायर ब्रिगेड कहा था?' असे प्रश्न टिझरमध्ये विचारले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाचा ट्रेलर या घटनेमागील अनेक गोष्टींचा पर्दाफाश करणार अशी शक्यता नाकारता येत नाही.

Accident Or Conspiracy GODHRA  मधील कलाकार

सिनेमाचा टिझर रिलीज होताच लोकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. या सिनेमात बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी असलेला अभिनेता रणवीर शोरे झळकतोय. याशिवाय मनोज जोशी,  गणेश यादव, हितू कनोडिया, गुलशन पांडे हे कलाकार Accident Or Conspiracy GODHRA  सिनेमात झळकत आहेत. हा सिनेमा १२ जुलै २०२४ ला रिलीज होणार आहे

Web Title: Accident Or Conspiracy GODHRA Official Trailer bigg boss ott 3 fame Ranvir Shorey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.