फराह खानच्या अनुसार गोविंदा बॉलीवूडचा सर्वश्रेष्ठ नर्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2016 12:48 PM2016-06-29T12:48:43+5:302016-06-29T18:18:43+5:30
नृत्य दिग्दर्शिका फराह खान हिच्या अनुसार गोविंदा हा बॉलीवूडचा सर्वश्रेष्ठ नर्तक आहे. नृत्याच्या बाबतीत सर्वोत्तम कलाकाराची निवड करण्याविषयी ज्यावेळी ...
न त्य दिग्दर्शिका फराह खान हिच्या अनुसार गोविंदा हा बॉलीवूडचा सर्वश्रेष्ठ नर्तक आहे. नृत्याच्या बाबतीत सर्वोत्तम कलाकाराची निवड करण्याविषयी ज्यावेळी तिला विचारले जाईल, त्यावेळी तिच्यासाठी गोविंदा हाच योग्य असेल.
‘माझ्यासाठी गोविंदा हा सर्वोत्तम बॉलीवूड नर्तक आहे. त्याच्याशिवाय मी दुसºया कोणालाही त्या ठिकाणी पाहू शकत नाही. तुम्ही मला तांत्रिक नर्तक दाखवू शकाल, मात्र नृत्य करताना जी मजा आहे, ती गोविंदाशिवाय नाही. त्याला अनेक तास नृत्य करताना मी पाहिले असल्याचे फराह म्हणाली.
त्याचे पदलालित्य आणि उन्माद याची तुलना करणे केवळ अशक्य आहे, असे फराहने सांगितले. प्रभू देवा आणि सरोज खान हे नृत्यदिग्दर्शक तिला आवडतात असेही ती म्हणाली.
‘मला प्रभू देवा आणि सरोज खान आवडतात. सरोज खान ८० आणि ९० च्या दशकातील क्वीन होती. तिची गाणी अजोड आहेत. श्यामक दावर सुद्धा खूप छान आहे. रेमो (डिसुझा) आणि बॉस्को-सीझर हे देखील चांगले नृत्य दिग्दर्शक आहेत. क्लासिकलमध्ये वैभवी मर्चंटचा दबदबा आहे. इथे असे अनेक आहेत. मला त्यांची गाणी आवडतात. केवळ काही खास पद्धत नव्हे’ असेही ती म्हणाली.
फराहने नुकतेच ‘सुलतान’ चित्रपटातील बेबी को बॉस पसंद है या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले. असा नृत्यप्रकार अवघड असतो. तिला आव्हाने स्वीकारणे नेहमीच आवडते असे ती म्हणाली.