कल्की कोचलीन म्हणते, बॉलिवूडमध्ये समान लैंगिकता आंदोलनासारखी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 03:45 PM2017-02-23T15:45:18+5:302017-02-23T21:15:18+5:30
लोकांच्या मते स्त्रीवादी असल्याचा संबंध ‘निंदा करणाºया महिलांशी’ जोडला जातो. अशा महिलांच्या मनात पुरुषांबद्दल नकारात्मक विचार असतात.
आ ल्या दमदार अभिनयाच्या बळावर हिंदी चित्रपटांत महत्त्वाचे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री कल्की कोचलीन हिच्या मते ‘स्त्रीवादी’ हा शब्दाला भारतीय समाजात नकारात्मक भूमिकेतून पाहिले जाते. हिच परिस्थिती चित्रपट सृष्टीतही कायम असून चित्रपटांमध्ये समान लैंगिकता निर्माण करणे एखाद्या आंदोलनासारखे असल्याचे मत कल्कीने व्यक्त केले आहे.
‘मार्गरिटा विथ अ स्ट्रा’ या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळविणारी अभिनेत्री कल्की कोचलीन हिने २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘देव डी’या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. कल्कीचा आगामी ‘मंत्रा’ या चित्रपटाचा नुकताचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटात ती १९९०च्या दशकातील वडिलांचा व्यवसाय हाती घेणाºया मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना कल्की म्हणाली, लोकांच्या मते स्त्रीवादी असल्याचा संबंध ‘निंदा करणाºया महिलांशी’ जोडला जातो. अशा महिलांच्या मनात पुरुषांबद्दल नकारात्मक विचार असतात.
कल्की म्हणाली, या शब्दाबद्दल लोकांमध्ये गैरसमज व जागरुकतेचा अभाव आहे. सामान्यत: स्त्रीवादी असल्याचे सांगताच लोक तुम्हाला अशा समूहाशी जोडतात ज्या पुरुषांच्या विरोधात आहेत. अनेक लोक स्त्रीवादी असतात हे त्यांना देखील माहिती नसते. चित्रपट उद्योग देखील स्त्रीवाद या विषयावर दोन समुहात वाटला गेला आहे. ते नेहमी असे म्हणतात की आम्ही स्त्री-पुरुष समानतेच्या बाजूने आहोत. मात्र, स्त्रीवादी नाही. अनेक चित्रपटातून स्त्रीयांच्या भूमिकेला महत्त्व देण्यात आले आहे. मात्र तो चित्रपट स्त्रीवादावर भाष्य करणारा आहे असे कुणीच सांगत नाही. याशिवाय चित्रपटात लैंगिक समानता निर्माण करणे गरजेचे आहे. असे करणे एखाद्या सामाजिक आंदोलनापेक्षा कमी नाही.
आपल्या आगामी चित्रपटाविषयी कल्की म्हणाली, मंत्रा या चित्रपटाची कथा त्या काळातील आहे ज्या काळात मी मोठी झाली आहे, यामुळे त्यावेळीच्या विरोधी चेहºयांना मी समजू शकते. आमच्या पिढीतील लोकांसाठी हा चित्रपट प्रासंगिक आहे. या चित्रपटात माझे वडील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या विरोधात लढा देत दिसतील. निकोलस खारकोंगर दिग्दर्शित मंत्रा या चित्रपटात कल्की कोचलीनसह लुशीन दुबे, शिव पंडित, रोहन जोशी, रजत कपूर व आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित होत आहे.