कोट्यवधींची मालकीण असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले हाल; अखेरच्या क्षणी मुलांनीही फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 04:47 PM2022-05-02T16:47:19+5:302022-05-02T18:12:25+5:30

Achala sachdev: 'ए मेरी जोहर जबी' या गाण्याने रातोरात सुपरस्टार झालेल्या अचला सचदेव यांना उतारवयात अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या.

achala sachdev had become lonely after the death of her husband son also did not take care of her | कोट्यवधींची मालकीण असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले हाल; अखेरच्या क्षणी मुलांनीही फिरवली पाठ

कोट्यवधींची मालकीण असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले हाल; अखेरच्या क्षणी मुलांनीही फिरवली पाठ

googlenewsNext

नशीबाचं चक्र कधी कसं फिरेल आणि कोणते दिवस अनुभवायला मिळतील याचा काही नेमक नसतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर कधीही दु:खाचा डोंगर कोसळू शकतो. तर, काही जणांचं नशीब रातोरात उजळूही शकतं. यात बॉलिवूडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आजवर असे अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले ज्यांनी करिअरचं उंच शिखर पाहिलं आहे. मात्र, उतारवयात त्यांच्यावर प्रचंड संकंट कोसळली. इतकंच नाही तर काही जणांना वृद्धाश्रमाची पायरी चढवी लागली. तर, काहींची ऐन पडत्या काळात मुलांनीही पाठ फिरवली. असाच काहीसा प्रकार ज्येष्ठ अभिनेत्री अचला सचदेव (achala sachdev) यांच्यासोबत घडला.

'ए मेरी जोहर जबी' या गाण्याने रातोरात सुपरस्टार झालेल्या अचला सचदेव यांना उतारवयात अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या.  ३० एप्रिल २०१२ मध्ये पुण्यातील एका रुग्णालयात अचला सचदेव यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, यावेळी त्यांचा एकही मुलगा त्यांच्यासोबत नव्हता. अमाप संपत्ती, यश, प्रसिद्धी मिळवूनही त्या मृत्यूसमयी एकाकी होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला.

उतारवयात दोन्ही मुलांनी फिरवली अचला यांच्याकडे पाठ

अचला यांचा लेक ज्योतिन युएसमध्ये राहतो. तर मुलगी मुंबईमध्येच राहते. मात्र, तरीदेखील या दोन्ही मुलांनी आपल्या आईकडे पाठ फिरवली. त्यांच्या म्हातारपणात दोन्ही मुलांनी एकदाही त्यांची विचारपूस केली नाही.

पतीच्या निधानंतर एकट्या पडल्या होत्या अचला

अचला यांचे पती क्लिफर्ड डगलस पीटर्स यांचं २००२ मध्ये निधन झालं.  त्यांच्या निधनानंतर अचला १२ वर्ष पुण्याजवळील कोणार्क इस्टेट अपार्टमेंटमध्ये राहात होत्या. यावेळी त्यांच्या देखभालीसाठी एक अटेंडर ठेवण्यात आला होता. परंतु, २०११ मध्ये त्या घरातल्या घरात पडल्या आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे कलाविश्वात कार्यरत असताना त्यांनी श्रीमंत, यश अनुभवलं. पण, पडत्या काळात त्यांच्या सख्ख्या मुलांनीच त्यांना एकटं पाडलं. २०११ मध्ये लयात काही उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. मात्र, २०१२ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मात्र, यावेळी त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या जवळ नव्हती. २००६ मध्येच त्यांनी त्यांचा राहता फ्लॅट जनसेवा फाऊंडेशना दान केला होता.

Web Title: achala sachdev had become lonely after the death of her husband son also did not take care of her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.