अ‍ॅक्टिंग माझा धंदा नव्हे, माझं पॅशन - नवाजुद्दीन सिद्दीकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2017 06:48 PM2017-01-15T18:48:54+5:302017-01-15T18:48:54+5:30

अभिनय हा कलाकारासाठी ‘जीव की प्राण’ असतो. अभिनयासाठी कलाकार काहीही करायला तयार होऊ शकतो. अभिनयाला धंदा नव्हे तर पॅशन ...

Acting is not my business, my passion - Nawazuddin Siddiqui | अ‍ॅक्टिंग माझा धंदा नव्हे, माझं पॅशन - नवाजुद्दीन सिद्दीकी

अ‍ॅक्टिंग माझा धंदा नव्हे, माझं पॅशन - नवाजुद्दीन सिद्दीकी

googlenewsNext
िनय हा कलाकारासाठी ‘जीव की प्राण’ असतो. अभिनयासाठी कलाकार काहीही करायला तयार होऊ शकतो. अभिनयाला धंदा नव्हे तर पॅशन मानणारा एक अभिनेता  बॉलिवूडमध्ये आहे. तो कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. होय, तो कलाकार म्हणजे ‘रईस’ मध्ये पोलिसाच्या भूमिकेत असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी. याच्यासाठी त्याचा अभिनय म्हणजे सर्वकाही. तो म्हणतो, ‘मी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हापासूनच माझी कला, माझा अभिनय हाच माझ्यासाठी सर्वकाही होता, आहे आणि राहणार.’ 

‘मुन्ना मायकेल’ या आगामी चित्रपटासाठी चर्चेत असलेला अभिनेता नवाजुद्दीन त्याच्या अनोख्या अभिनयामुळे ओळखला जातो. टायगर श्रॉफसोबत तो डान्सचे प्रशिक्षण घेत असून, या चित्रपटाकडून त्याला बºयाच अपेक्षा आहेत. अभिनयाबद्दल विशेष प्रेम असलेल्या नवाजुद्दीनच्या कलाकारांकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा सांगताना तो म्हणाला,‘ दिग्दर्शक हा चित्रपटाचा ‘माय-बाप’ असतो. कलाकाराकडून त्याला हवा तसा अभिनय करून घेणे अपेक्षित असते. त्याने दिलेले काम योग्यरितीने करून देणे हेच तर कलाकाराचे काम असते. जर मला दिग्दर्शकानी डान्सवर आधारित भूमिका दिली असेल तर मला ते करावेच लागणार आहे.’

कलाकार म्हणून तुझ्या समाधानाबद्दल काय? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘जेव्हा गोष्ट माझ्या कामाबद्दल येते तेव्हा त्यात माझ्या समाधानाचा प्रश्न येतच नाही. प्रत्येक काम हे माझ्या समाधानाप्रमाणे होईलच असे नाही तर मला त्यातून काय शिकायला मिळते हे जास्त महत्त्वाचं आहे.’ 

Web Title: Acting is not my business, my passion - Nawazuddin Siddiqui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.