अ‍ॅक्शन हिरो टायगर श्रॉफची रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 05:13 PM2023-10-31T17:13:57+5:302023-10-31T17:16:23+5:30

फिटनेस फ्रिक, जबरदस्त स्टंट करणाऱ्या टायगरची तरुणींमध्ये तुफान क्रेझ आहे.

Action hero Tiger Shroff's entry in Rohit Shetty's Singham | अ‍ॅक्शन हिरो टायगर श्रॉफची रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये एंट्री

अ‍ॅक्शन हिरो टायगर श्रॉफची रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये एंट्री

टायगर श्रॉफने २०१२ साली हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता.  टायगर श्रॉफची ओळख ही चित्रपट जगतात अॅक्शन हिरो अशी आहे. ‘बागी’, ‘फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकल’, ‘बागी २’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’, ‘वॉर’, ‘बागी ३’, ‘हिरोपंती २’ या चित्रपटांत त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. अलिकडेच त्याचा  'गणपत' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. गणपत या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत क्रिती सनॉन आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. गणपतमध्येही टायगरने अनेक अॅक्शन सीन्स दिले आहेत.  टायगर हा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका करताना दिसला आहे. गणपतनंतर टायगरकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. 

फिटनेस फ्रिक, जबरदस्त स्टंट करणाऱ्या टायगरची तरुणींमध्ये तुफान क्रेझ आहे. त्यामुळेच हिरोपंती या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर त्याचा फॅनफॉलोअर्स कमालीचा वाढला. म्हणूनच, टायगरविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.  टायगरचा पहिला चित्रपट हिरोपंती हा 2014 मध्ये आला होता हिरोपंती सिनेमा बॉक्स ऑफिसवर 6.8 कोटींची कमाई केली होती. टायगरने अल्पावधीतच लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

टायगरने स्वत:ला अॅक्शन हिरो म्हणून सिद्ध केलं. तो एक चांगला डान्सरही आहे. टायगर मायकल जॅक्सनचा खूप मोठा चाहता आहे. स्टंटसोबतच त्याने आपल्या चित्रपटांमध्ये नृत्यकौशल्यही दाखवले आहे. 2014 मध्ये त्याला तायक्वांडोमध्ये 'ब्लॅक बेल्ट' देण्यात आला होता.  गणपतनंतर टायगर रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये झळकणार आहे. याशिवाय अक्षय कुमारसोबतही तो स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

Web Title: Action hero Tiger Shroff's entry in Rohit Shetty's Singham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.