या कारणामुळे होतेय रजनिकांत यांच्या अटकेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 02:51 PM2020-01-30T14:51:19+5:302020-01-30T14:56:08+5:30
रजनिकांत एका संकटात सापडले आहे. त्यांना अटक केले जावे अशी मागणी सध्या केली जात आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांना केवळ दक्षिणेकडील राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांची एक झलक पाहाण्यासाठी त्यांचे चाहते आतुर असतात. त्यांनी नुकतेच मॅन व्हर्सेस वाईल्ड या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले होते. त्यांनी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्ससोबत कर्नाटकमधील बांदीपूर येथील टायगर रिझर्व्हमध्ये चित्रीकरण केले असून हा भाग प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. या चित्रीकरणादरम्यान रजनिकांत यांना दुखापत झाली असल्याचे म्हटले जात होते. पण ही केवळ अफवा असल्याचे आता समोर आला आहे. पण आता या चित्रीकरणामुळे रजनिकांत एका संकटात सापडले आहे. त्यांना अटक केले जावे अशी मागणी सध्या केली जात आहे.
After our episode with Prime Minister @NarendraModi of India helped create a bit of TV history, (3.6 billion impressions), superstar @Rajinikanth joins me next, as he makes his TV debut on our new show #IntoTheWildWithBearGrylls on @DiscoveryIN. #ThalaivaOnDiscoverypic.twitter.com/WKscCDjPZc
— Bear Grylls (@BearGrylls) January 29, 2020
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रजनिकांत आणि बेअर ग्रिल्स यांनी मॅन व्हर्सेस वाईल्डसाठी चित्रीकरण बांदीपूरा येथे केले. पण या चित्रीकरणामुळे प्राण्यांना इजा पोहोचली जाऊ शकली असती. त्यामुळे प्राण्यांचा विचार केला गेला नाहीये या कारणाने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या चित्रीकरणाविरोधात नुकतेच आंदोलन केले. या चित्रीकरणासाठी मोठ्या संख्येने लोक आले असून यामुळे प्राण्यांच्या जीवाला नुकसान होऊ शकत होते. तसेच सध्याच्या वातारणामुळे काही कारणास्तव आग लागली असती तर ती आग आटोक्यात आणणे कठीण झाले असते. हेच चित्रीकरण पावसाळ्यात देखील होऊ शकले असते असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याच प्रकरणामुळे रजनिकांत यांच्या अटकेची मागणी होत आहे.
या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाल्यानंतर रजनिकांत यांनी ट्वीट करून बेअर ग्रिल्सचे आभार मानले होते. हा माझ्यासाठी एक अतिशय सुंदर अनुभव होता असे त्यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून सांगितले होते.
Thank you very much dear @BearGrylls for an unforgettable experience ... love you. @DiscoveryIN thank you 🙏🏻 #IntoTheWildWithBearGrylls
— Rajinikanth (@rajinikanth) January 29, 2020