'या' चित्रपटात डेजी शाह करणार सलमान खानसोबत अभिनय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2017 06:24 AM2017-06-12T06:24:45+5:302017-06-12T11:55:42+5:30

सलमान खान आपल्याला कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार या चित्रपटात दोन अभिनेत्री असणार ...

Actor acting with Salman Khan to make Daisy Shah in the film | 'या' चित्रपटात डेजी शाह करणार सलमान खानसोबत अभिनय

'या' चित्रपटात डेजी शाह करणार सलमान खानसोबत अभिनय

googlenewsNext
मान खान आपल्याला कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार या चित्रपटात दोन अभिनेत्री असणार आहेत. यात जॅकलिन फर्नांडिसचे नाव याआधीचे फायनल झाले आहे. आता असे कळतेय की यात डेजी शाहदेखील असणार आहे. डेजीचा हा सलमान सोबतचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. 

या चित्रपटात सलमान खान एका 13 वर्षांच्या मुलीच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट रेमोचा एबीसीडी चित्रपटाचा तिसरा भाग असल्याचे समजते आहे मात्र रोमोने ही गोष्ट नाकारली आहे. डेजी शाहने 'जय हो' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. याचित्रपट तिच्यासोबत सलमान खान होता. यानंतर ती 'हेट स्टोरी 3' मध्ये दिसली. हा तिचा बॉलिवूडमधला तिसरा चित्रपट आहे. डेजीला म्हणावे तसे यश अजून मिळवता आले नाही. सलमान सोबत डेब्यू करुन ही तिचा जय हो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला यानंतर आलेला हेट स्टोरी3 ही काही कमला करु शकला नाही. त्यामुळे या चित्रपटातकडून तिला नक्कीच हिटची अपेक्षा  असेल. 

सलमान सध्या कबीर खानच्या ट्यूबलाइट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रमझानच्या मुहुर्तावर 23 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच सलमान सध्या टायगर जिंदा है चे चित्रिकरण ही करतोय. हा चित्रपट  एक था टायगर है चा सीक्वल आहे. याचित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ते काही दिवसांपूर्वीच आबुधाबीला जाऊन आले. यानंतर सलमान आणि कॅटरिना पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ आले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Web Title: Actor acting with Salman Khan to make Daisy Shah in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.