अल्लू अर्जुनने 'पुष्पा'च्या क्रू मेंबर्सला दिली सोन्याची अंगठी; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल 'क्या बात!'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 12:35 PM2021-12-21T12:35:56+5:302021-12-21T12:41:33+5:30
Allu Arjun: अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटांसोबतच आपल्या नम्रपणा आणि साधेपणामुळेही कायम चर्चेत असतो. यावेळीदेखील त्याने असंच काहीसं केलं आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचा बहुप्रतिक्षीत ठरलेला 'पुष्पा' (Pushpa: The Rise) हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बक्कळ कमाई केली असून सध्या सर्वत्र या चित्रपटातील नायक अल्लू अर्जुन याची चर्चा होत आहे. अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटांसोबतच आपल्या नम्रपणा आणि साधेपणामुळेही कायम चर्चेत असतो. यावेळीदेखील त्याने असंच काहीसं केलं आहे. ज्यामुळे नेटकरी त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर करत आहेत. अल्लू अर्जुनने पुष्पाच्या क्रू मेंबर्सला (crew members) चक्क सोन्याची अंगठी गिफ्ट केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनने 'पुष्पा'च्या सेटवरील सर्व क्रू मेंबर्सला १०-१० ग्रँमच्या सोन्याच्या अंगठ्या गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. दाक्षिणात्य चित्रपट व्यापार विश्लेषक आणि लेखक Manobala Vijayabalan यांनी ट्विट करुन याविषयीची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अल्लू अर्जुनच्या नावाची चर्चा आहे.
Icon StAAr #AlluArjun gifted gold rings weighing 10 grams to crew members of #Pushpa on Monday.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 8, 2021
The star was elated for the swift completion.
'पुष्पा'च्या सेटवर प्रत्येक क्रू मेंबरने उत्तम साथ दिल्यामुळे अल्लूने खुश होऊन त्यांना सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली आहे. या चित्रपटातील एका गाण्याचं चित्रीकरण लवकरात लवकर पण व्यवस्थितरित्या पूर्ण करायचं होतं. विशेष म्हणजे टीमने दिलेल्या साथीमुळेच हे गाणं सुंदररित्या चित्रीत झालं. त्यामुळे अल्लू अर्जुनने अंगठी गिफ्ट केली आहे.
दरम्यान, या गाण्यामध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) झळकली आहे. पुष्पा हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यातील पहिला भाग रिलीज झाला असून दुसरा भाग पुढील वर्षी २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला पार्ट प्रदर्शित झाला असून तो तेलुगू व्यतिरिक्त मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.