बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, २० वर्षीय मुलीचं कॅन्सरने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 01:32 PM2024-07-19T13:32:03+5:302024-07-19T13:35:11+5:30

बॉलिवूड विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेता आणि निर्माता असलेल्या कृष्ण कुमार यांची मुलगी आणि भूषण कुमारची चुलत बहीण तिशा कुमार हिचं निधन झालं आहे.

actor and producer krishnan kumar daughter tisha kumar died of cancer at the age of 20 | बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, २० वर्षीय मुलीचं कॅन्सरने निधन

बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, २० वर्षीय मुलीचं कॅन्सरने निधन

बॉलिवूड विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेता आणि निर्माता असलेल्या कृष्ण कुमार यांची मुलगी आणि भूषण कुमारची चुलत बहीण तिशा कुमार हिचं निधन झालं आहे. २०व्या वर्षी तिशाने या जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा ती सामना करत होती. अखेर गुरूवारी(१८ जुलै) तिची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि तिशाचा मृत्यू झाला. तिशाच्या निधनाने कुमार कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, तिशा गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. तिच्यावर जर्मनीतील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु, गुरुवारी उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. टी सीरिजच्या टीमकडून तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. "कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार हिचं गंभीर आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा कठीण काळ आहे", असं टी सीरीजच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. 

कृष्ण कुमार हे टी सीरिज या निर्माती कंपनीचे मालक आहेत. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. बेवफा सनम या सिनेमामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. या सिनेमातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. लकी : नो टाइम फॉर लव्ह, रेडी, डार्लिंग, एअरलिफ्ट, सत्यमेव जयते या सिनेमांची त्यांनी निर्मिती केली होती. तिशा कृष्ण कुमार यांच्याबरोबर अनेक इव्हेंटला हजेरी लावायची. अॅनिमल सिनेमाच्या सक्सेस पार्टीतही ती दिसली होती. तिशाचा जन्म ६ सप्टेंबर २००३ रोजी झाला होता. कृष्ण कुमार आणि तान्या सिंह यांची ती मुलगी होती. 
 

Web Title: actor and producer krishnan kumar daughter tisha kumar died of cancer at the age of 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.