Shocking! सलमान खानच्या नावानं एक महिला घालत होती लोकांना गंडा, अभिनेत्याने केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:55 PM2020-05-19T12:55:48+5:302020-05-19T12:56:41+5:30

सलमान खानच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

actor Ansh Arora received fake message in name of Salman Khan, filed complaint TJL | Shocking! सलमान खानच्या नावानं एक महिला घालत होती लोकांना गंडा, अभिनेत्याने केला पर्दाफाश

Shocking! सलमान खानच्या नावानं एक महिला घालत होती लोकांना गंडा, अभिनेत्याने केला पर्दाफाश

googlenewsNext

मालिका व चित्रपटात काम मिळवून देतो असं सांगत अनेक खोट्या कास्टिंग एजेंटने लोकांनी फसवणूक केल्याची प्रकरणं समोर येत असतात. पण आता सलमान खानची प्रोडक्शन कंपनी सलमान खान फिल्मच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ज्यात SKF च्या नावाने काही लोकांना ईमेल पाठवण्यात आले आणि सलमानच्या आगामी प्रोजेक्टच्या ऑडिशनची खोटी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण टीव्ही अभिनेता अंश अरोराने उघडकीस आणले आणि याबाबत पोलिसात तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे.

एबीपीच्या रिपोर्टनुसार, अंश अरोराला shruti@salmankhanfilm.com वरुन एक ईमेल आला होता. ज्यात त्याला सलमानच्या चित्रपटात रोलची ऑफर करण्यात आली होती. या मेलच्या आधारावरच अंशने ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.


याबद्दल अंश अरोराने सांगितले, त्याला या ईमेलमध्ये सलमान खानचा आगामी चित्रपट 'टाइगर जिंदा है 3'च्या व्हिलनच्या भूमिकेसाठी निवडण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय 3 मार्चला सलमान खान आणि दिग्दर्शक प्रभू देवा यांच्यासोबत एक मिटिंग असल्याचेही नमूद करण्यात आले होते. पण नंतर ही मिटिंग रद्द झाल्याचे सांगण्यात आले. अंशने सांगितले की या दरम्यान त्याचे श्रुती नावाच्या एका महिलेशी बोलणे झाले होते.


अंश पुढे म्हणाला की, मला फक्त मेलच आला नाही तर माझ्याशी कॉल आणि मेसेज वरूनही संपर्क करण्यात आला. ज्यात सिनेमासाठी प्रोफाइल आणि व्हिडीओ पाठवण्यास सांगितले गेले होते. मला त्यावेळी हे समजत नव्हते की सलमान आणि प्रभूदेवाने मला केवळ व्हिडिओ बेसिसवर कसे काय सिलेक्ट केले. 

अंश अरोराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने 'कसम', 'क्वीन' यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Web Title: actor Ansh Arora received fake message in name of Salman Khan, filed complaint TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.