अभिनेत्याने चहात टाकून खाल्ला रसगुल्ला; शेअर केला अजब व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 17:05 IST2023-03-01T17:04:34+5:302023-03-01T17:05:33+5:30
Ashish vidyarthi: या व्हिडीओमध्ये चहा रसगुल्ला कशा प्रकारे तयार करण्यात येतो हे त्यांनी दाखवलं असून हा नवा पदार्थ चवीला कसा आहे हेदेखील त्यांनी सांगितलं आहे.

अभिनेत्याने चहात टाकून खाल्ला रसगुल्ला; शेअर केला अजब व्हिडीओ
जगात खवैय्यांची काही कमी नाही. अनेक जणांना वेगवेगळ्या ठिकाणचे, चवीचे नवनवीन पदार्थ खाऊन पाहायला आवडतात. यात ज्येष्ठ अभिनेता आशिष विद्यार्थीदेखील (Ashish vidyarthi) मागे नाहीत. आशिष विद्यार्थी उत्तम खवैय्य असून ते कायम नवनवीन पदार्थ ट्राय करत असतात. इतकंच नाही तर कोणत्याही नवीन पदार्थ ट्राय करताना त्याचे व्हिडीओ, फोटो चाहत्यांसोबत शेअरदेखील करतात. यावेळी त्यांनी असाच एक नवा पदार्थ चाखून पाहिला आहे. मात्र, तो पदार्थ पाहिल्यावर अनेकांनी नाकं मुरडली आहेत.
अलिकडेच आशिष विद्यार्थी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ते चक्क चहामध्ये रसगुल्ला बुडवून खात असल्याचं दिसून येत आहे. “तुम्ही कधी रसगुल्ला चहा ट्राय केला आहे? चुमुके चोमोक साउथसिटी,” असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये चहा रसगुल्ला कशा प्रकारे तयार करण्यात येतो हे त्यांनी दाखवलं असून हा नवा पदार्थ चवीला कसा आहे हेदेखील त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्यांना हा पदार्थ आवडल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, नेटकऱ्यांना हा प्रकार फार काही रुचला नाही.
दरम्यान, हे दृश्य काही डोळ्यांना पटत नाहीये आणि तुम्ही हा पदार्थ आवडल्याचं म्हणताय, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, पण हा व्हिडीओ पाहून माझा मूडच खराब झाला असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.