Asif Basra Suicide: फक्त शूटींगसाठीच मुंबईत यायचा आसिफ बसरा, अमरावतीशी होते कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 01:21 PM2020-11-13T13:21:26+5:302020-11-13T13:25:32+5:30

मुंबईतील झगमगाट सोडून आसिफ धर्मशाळा येथे राहत होता. केवळ शूटींगसाठीच तो मुंबईत यायचा.

actor asif basra death manoj bajpayee says he was peace loving thats why he lived in dharamshala |  Asif Basra Suicide: फक्त शूटींगसाठीच मुंबईत यायचा आसिफ बसरा, अमरावतीशी होते कनेक्शन

 Asif Basra Suicide: फक्त शूटींगसाठीच मुंबईत यायचा आसिफ बसरा, अमरावतीशी होते कनेक्शन

googlenewsNext

चित्रपट आणि टीव्ही अभिनेते आसिफ बसराने गुरुवारी धर्मशाळा येथे गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. आसिफ डिप्रेशनमध्ये होता, असे मानले जात आहे. मात्र अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण कळू शकलेले नाही. 
53 वर्षांच्या आसिफच्या मृत्यूमुळे बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीला जबर धक्का बसला आहे. लॉकडाऊनआधीच मनोज व आसिफ यांनी एकत्र काम केले होते. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मनोजने आसिफबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

मनोजने सांगितले, ‘मी व आसिफ फार टचमध्ये नव्हतो. पण मी त्याच्यासोबत काम केले होते. अगदी लॉकडाऊनआधी आम्ही एकत्र काम केले होते. आम्ही सोबत असताना खूप चांगला वेळ जायचा. आसिफचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त होता. तो थिएटर आर्टिस्ट होता, त्यामुळे सेटवर एकत्र आलो की, त्याची नि माझी गट्टी जमायची. तो एक गुणी अभिनेता होता. हसमुख होता. त्याला शांती, शांतता आवडायची. त्यामुळेच मुंबईतील झगमगाट सोडून तो धर्मशाळा येथे राहत होता. केवळ शूटींगसाठीच तो मुंबईत यायचा. आमच्यापैकी खूप कमी लोक मुंबई बाहेर राहणे पसंत करतात. तो यापैकी एक होता. मुंबईबाहेर राहण्याचा त्याचा निर्णय मोठा निर्णय होता.’

अमरावतीशी आहे कनेक्शन
मुंबई ही आसिफची कर्मभूमी होती आणि धर्मशाळा येथे तो राहत होता. याच आसिफचा जन्म मात्र महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला होता. 27 जुलै 1967 रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला होता.

नाटक पाहण्यात खर्च करायचा पूर्ण पगार
आसिफला लहानपणापासूनच अभिनयाचे वेड होते. म्हणायला त्याने अभिनयाचे कुठलेही प्रशिक्षण घेतले नव्हते. पण तो एक दमदार अभिनेता होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आसिफ मुंबईत आला तो अभिनयाच्या वेडापायी. स्ट्रगल काळात मुंबईत त्याने मिळेल ते काम केले. या कामातून मिळणारे सर्व पैसे तो नाटक पाहण्यात खर्च करायचा.

कुत्र्याच्या पट्ट्याने घेतला गळफास
गुरूवारी दुपारी आसिफ बसरा आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन फिरायला गेला होता. घरी आल्यानंतर आपल्या या कुत्र्याच्या पट्ट्याने त्याने गळफास घेतला. आसिफ हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे कळते.

लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची चर्चा

रिपोर्टनुसार, आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मक्लोडगंजच्या एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत एक विदेशी महिला सुद्धा राहत होती. या महिलेसोबत आसिफ लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची चर्चा आहे.

 बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा याची आत्महत्या, कुत्र्याच्या पट्ट्याने लावला गळफास

Web Title: actor asif basra death manoj bajpayee says he was peace loving thats why he lived in dharamshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.