वयाच्या ५४ व्या वर्षी मिळालं यश, फक्त १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने घेतले तब्बल ४ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 10:53 IST2025-01-27T10:52:45+5:302025-01-27T10:53:25+5:30
आज अभिनेता ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

वयाच्या ५४ व्या वर्षी मिळालं यश, फक्त १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने घेतले तब्बल ४ कोटी
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना उशिरा यश मिळालं. मात्र आता ते बॉक्सऑफिस गाजवतात. काही सेकंदांच्या भूमिकेसाठीही ते करोडो रुपये घेतात. असाच एक अभिनेता जो एकेकाळी ९० च्या दशकात आघाडीवर होता. मात्र नंतर त्याचे काही सिनेमे सलग आपटले आणि तो फ्लॉप हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला. बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०२३ साली त्याचं नशीब चमकलं आणि आज इंडस्ट्रीतला सर्वात खतरनाक व्हिलन म्हणून त्याची ओळख आहे. कोण आहे तो?
२०२३ वर्षाच्या शेवटी १ डिसेंबर रोजी 'Animal' सिनेमा आला आणि सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. रणबीर कपूरला या सिनेमात सगळ्यांनीच कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये बघितलं. तर दुसरीकडे बॉबी देओल (Bobby Deol) हा अभिनेता सरप्राईजच ठरला. बॉबीचं सिनेमात काम मध्यंतरानंतर आहे. केवळ १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी त्याने तब्बल ४ कोटी रुपये घेतले. 'अबरार'ही त्याच्या खतरनाक व्हिलनची भूमिका आयकॉनिक ठरली. आज बॉबी देओल ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तो सध्या इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या खलनायकांपैकी एक आहे.
'ॲनिमल' नंतर बॉबी यावर्षी 'कंगुआ' सिनेमातही दिसला. तसंच 'अॅनिमल'पूर्वी त्याची 'आश्रम' वेबसीरिज खूप गाजली होती. २०१४ ते २०१६ यावर्षात बॉबीकडे एकही काम नव्हतं. तो दारुच्याही आहारी गेला होता. हाय प्रोफाईल नाईट क्लब्स, पब्समध्ये तो डीजेचंही काम करायचा. त्याने आपल्या करिअरच्या या सेकंड इनिंगचं श्रेय सलमान खानला दिलं आहे. सलमाननेच त्याला रेस २ मध्ये संधी दिली आणि तिथून बॉबी पुन्हा इंडस्ट्रीत आला. त्याचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.