कपिल शर्माच्या 'Kis Kisko Pyaar Karoon' चा सीक्वेल येणार; शूटिंगला सुरुवात, फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 10:53 IST2025-01-27T10:50:04+5:302025-01-27T10:53:33+5:30

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हा त्याच्या हा विनोदी शैलीसाठी ओळखला जातो.

actor comedian kapil sharma kis kis ko pyaar 2 movie shooting start shared photo on social media | कपिल शर्माच्या 'Kis Kisko Pyaar Karoon' चा सीक्वेल येणार; शूटिंगला सुरुवात, फोटो समोर

कपिल शर्माच्या 'Kis Kisko Pyaar Karoon' चा सीक्वेल येणार; शूटिंगला सुरुवात, फोटो समोर

Kapil Sharma: कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हा त्याच्या हा विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. कॉमेडिचं अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिल शर्माने अभिनय क्षेत्रात देखील आपलं नशीब अजमावलं आहे. 'किस किस से प्यार करु' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक देखील झालं. अशातच लवकरच कपिल शर्मा पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. 'किस किस से प्यार करु' च्या सीक्वलमध्ये तो पाहायला मिळणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याचं शूटिंग सुद्धा सुरु करण्यात आल्याचं कळतंय. 


कपिल शर्माने नुकतीच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. दरम्यान, कपिलने किस किस को प्यार करु च्या सीक्वेलच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याचे खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत त्याने संकेत दिले आहेत. चित्रपटाच्या सेटवरील पूजा करतानाचे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, प्रेक्षकांच्या आग्रहास्तव, किस किस को प्यार करु-२. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

२०१५ मध्ये किस किस को प्यार करु चा पहिला भाग रिलीज करण्यात आला होता. या रोमकॉम चित्रपटाचं दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा अब्बास मस्तान आणि कपिल शर्मा या प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या किस किस को प्यार करु च्या सीक्वलच्या दिग्दर्शन अनुपम गोस्वामी करणार आहेत. शिवाय रजत जैन, गणेश जैन आणि अब्बास मस्तान यांची निर्मीती आहे. फुकरे फेम मनजोत सिंह या दुसऱ्या भागातही विनोदी भमिकेत दिसणार आहे., त्यामुळे चाहते लोटपोट हसणार हे मात्र नक्की. 

अलिकडेच कपिल शर्मा अभिनेत्री तब्बू, कृती सनॉन आणि करीना कपूर स्टारर 'क्रू' या सिनेमात दिसला होता. त्यामध्ये त्यांनी तब्बूच्या पतीची भूमिका वठवली. 

Web Title: actor comedian kapil sharma kis kis ko pyaar 2 movie shooting start shared photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.