अभिनेता इमरान हाश्मीचं साऊथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, दिसणार या सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 19:00 IST2023-06-15T19:00:08+5:302023-06-15T19:00:24+5:30
Emraan Hashmi : इमरान हाश्मी साऊथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

अभिनेता इमरान हाश्मीचं साऊथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, दिसणार या सिनेमात
दिग्दर्शक सुजीतचा गँगस्टर ड्रामा ओजी(OG)ची घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. बहुप्रतिक्षीत आगामी चित्रपटांपैकी एक ‘OG’ मध्ये पॉवर स्टार पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या प्रगतीपथावर असताना आणि त्यातील काही भाग मुंबईत शूट करण्यात आला आहे. निर्माते आता चित्रपटाच्या शूट शेड्यूलला सुरुवात करण्यासाठी हैदराबादला जाणार असल्याचं समजतंय. या चित्रपटाचा एक मोठी अपडेट समोर येत असून अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi)या चित्रपटाचा एक भाग होणार असल्याचे समजते आहे.
तेलुगू ड्रामा चित्रपटात इमरान हाश्मी नेमेसिसच्या भूमिकेत दिसणार आहे. एक महत्त्वपूर्ण भूमिका तो या चित्रपटात साकारणार असल्याचे समजते आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याबाबत बोलताना इमरान हाश्मी सांगतो की, दक्षिण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीत 'OG' या चित्रपटाद्वारे या नव्या प्रवासाला मी सुरुवात करत आहे आणि त्यासाठी मी उत्सुक आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट आकर्षक आहे आणि ती मला आव्हानात्मक भूमिका देते. मी पवन कल्याण सर, सुजीत, दानय्या सर आणि टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे, मला विश्वास आहे की आम्ही प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव तयार करू "
निर्मात्यांनी तमिळ अभिनेत्री श्रीया रेड्डी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याची अधिकृत घोषणा केली. थमन एसच्या संगीतासह, 'OG' ची निर्मिती DVV दानय्या, सुजीत यांनी DVV एंटरटेनमेंट्स बॅनरखाली लिखित आणि दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांचीही प्रमुख भूमिका साकारणार आहेत.