गोविंदाने खरंच हॉलिवूडच्या 'अवतार'ची ऑफर नाकारली? पहलाज निहलानी म्हणाले- "त्यांच्या डोक्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:20 AM2024-07-17T10:20:36+5:302024-07-17T10:20:54+5:30
सुपरस्टार गोविंदाने अनेक मुलाखतीत दावा केला होता की त्याने हॉलिवूडच्या अवतार सिनेमाची ऑफर रिजेक्ट केली. यामागचं सत्य पहलाज निहलानी यांनी उघड केलंय (govinda, pehlaj nihlani, avtaar)
बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदाने (govinda) अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. गोविंदाचे सिनेमे म्हणजे सुपरहिटची गॅरंटी हे समीकरण ठरलेलं आहे. गोविंदा सध्या सिनेमांमध्ये इतकं काम करताना दिसत नाही. पण गोविंदाने त्याच्या अफलातून कॉमिक टायमिंगने एक काळ गाजवलाय. गोविंदाने अनेक मुलाखतींमध्ये दावा केलाय की, त्याने हॉलिवूडच्या 'अवतार' सिनेमाची ऑफर रिजेक्ट केली होती. अखेर यामागचं सत्य नेमकं काय याचा खुलासा पहलाज निहलानी यांनी केलाय.
पहलाज निहलानी गोविंदाच्या दाव्याबद्दल काय म्हणाले?
गोविंदाने अनेक मुलाखतींमध्ये दावा केला होता की त्याने जेम्स कैमेरुनच्या 'अवतार' सिनेमाची ऑफर नाकारली. यावर पहलाज निहलानी म्हणाले, "मी त्यांच्यासोबत अवतार नावाची वेगळी फिल्म बनवायला घेतली. मी गोविंदासोबत त्या सिनेमाची ४० मिनिटं शूट केली. मला ते माझं सर्वोत्कृष्ट काम वाटत होतं पण त्या फिल्मचं शूटींग पुढे रद्द झालं. त्या सिनेमाचंही नावही अवतार असल्याने गोविंदाच्या डोक्यात काय आलं काय माहित. त्याने पुढे दावा केला की त्याने हॉलिवूडच्या अवतार सिनेमाची ऑफर नाकारली. त्याच्या डोक्यातली डिस्क फिरली आहे. हिंदी भाषेतल्या सोडून तो इंग्रजी भाषेतल्या अवतारकडे वळाला."
🎬 “Sutradhar with Vineet Rai” Episode 1, Bollywood is copying other films frame by frame
— Friday Talkies (@ftd_films) July 12, 2024
Subscribe to ‘FRIDAY TALKIES’on YouTube for more exclusive content.#SutradharWithVineetRai#MehulKumar#BollywoodLegends#BehindTheScenes#FilmMaking#ExclusiveInterview#FridayTalkiespic.twitter.com/bBKoPJlxDK
गोविंदा यांच्या मनावर अंधश्रद्धेचा पगडा: पहलाज निहलानी
फिल्ममेकर पहलाज निहलानी पुढे म्हणाले की, "गोविंदा हळूहळू अंधश्रद्धेकडे झुकत चालला. तो म्हणायचा की, झुंबर सेटवर पडेल त्यामुळे तो सर्वांना दूर जायला सांगायचा. याशिवाय कादर खान बुडतील अशी भविष्यवाणी तो करायचा. अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊन तो लोकांना कपडे बदलायला सांगायचा. याशिवाय काही खास दिवशी तो काम करायला नकार द्यायचा. गोविंदाचं जे पुढे अधःपतन झालं त्यासाठी या गोष्टी कारणीभूत आहेत."