मला राजकारणापासून दूर ठेवा; ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर गोविंदाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 02:45 PM2023-08-04T14:45:18+5:302023-08-04T14:46:17+5:30

अभिनेता गोविंदाचे ट्विटर हॅक करुन हरियाणा हिंसाचाराबाबत ट्विट करण्यात आले.

actor Govinda, Keep me out of politics; Govinda's reaction after his Twitter account was hacked | मला राजकारणापासून दूर ठेवा; ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर गोविंदाची प्रतिक्रिया

मला राजकारणापासून दूर ठेवा; ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर गोविंदाची प्रतिक्रिया

googlenewsNext

Actor Govinda: अलीकडेच हरियाणातील नूहमध्ये हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारामुळे अभिनेता गोविंदा बुधवारी वादात सापडला. यामागे गोविंदाच्या ट्विटरवरुन केलेले एक ट्विट होते. हे ट्विट हरियाणातील हिंसाचाराबद्दल होते. हे ट्विट समोर आल्यानंतर गोविंदा ट्रोल होऊ लागला. मात्र, नंतर इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत गोविंदाने त्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे सांगितले. 

या प्रकरणावर इंस्टावर स्पष्टीकरण दिल्यानंतर गोविंदाने एका वेबसाइटला मुलाखत दिली आहे. त्यात तो म्हणाला की, मला राजकारण सोडून 18 वर्षे झाली आहेत. राजकारणात परत येण्यासाठी मी ट्विट करणारा नाही. अशा प्रकारची फेक न्यूज धोकादायक आहे, कारण लोक अशा ट्विटद्वारे माझ्याबद्दल चुकीचे मत बनवू शकतात.

गोविंदा पुढे म्हणाला की, मला हरियाणात शोज मिळू नये, काम मिळून नये, यासाठी कुणीतरी हे केले असावे. ज्या व्यक्तीला सर्वांनी खूप भरभरुन प्रेम दिले, ते काहींना खपत नाही. लोकांनी मला राजकारण आणि त्यांच्या छुप्या अजेंडापासून दूर ठेवावे, अशी माझी इच्छा आहे. ना मी कोणाच्या राजकारणात गेलो, ना मला कोणाचा पाठिंबा मिळाला. माझ्या चित्रपटाला थिएटर्स मिळाले नाहीत, मला खूप त्रास झालाय, अशी प्रतिक्रिया गोविंदाने दिली. 

हॅक झालेल्या अकाउंटवरुन काय लिहिले ?
एका ट्विटर युजरने हरियाणातील हिंसाचाराचा व्हिडिओ शेअर केला होता. मुस्लिमांची दुकाने जमावाने लुटल्याचा दावा यात करण्यात आला. तेच ट्विट गोविंदाच्या ट्विटर अकाऊंटवरुन रिट्विट करण्यात आले, “आपण इतके खालच्या पातळीवर गेलो? लाज वाटावी स्वतःला हिंदू म्हणवून घेणार्‍या लोकांना. शांतता निर्माण करा. आपण लोकशाहीत आहोत." असे ट्विट करण्यात आले होते. यानंतर गोविंदाने सायबर क्राइममध्ये तक्रार करणार असल्याचे सांगितले होते.
 

Web Title: actor Govinda, Keep me out of politics; Govinda's reaction after his Twitter account was hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.