"सतत ती मला..."; प्रियांका चोप्रासोबत झालेल्या ब्रेकअप मागील हरमन बावेजाने अखेर सांगितल कारण, म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 05:56 PM2023-05-25T17:56:15+5:302023-05-25T18:06:07+5:30

हरमन आणि प्रियंका 'लव्ह स्टोरी २०५०’च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमातही पडले. पण हे नातं फार काळ टिकलं नाही.

Actor harman baweja reveal the reason of breakup with priyanka chopra | "सतत ती मला..."; प्रियांका चोप्रासोबत झालेल्या ब्रेकअप मागील हरमन बावेजाने अखेर सांगितल कारण, म्हणाला…

"सतत ती मला..."; प्रियांका चोप्रासोबत झालेल्या ब्रेकअप मागील हरमन बावेजाने अखेर सांगितल कारण, म्हणाला…

googlenewsNext

हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रिय झालेला हरमन बावेजा तुम्हाला आठवतोय का ? हरमनने ‘लव्ह स्टोरी २०५०’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात त्याच्यासोबत प्रियंका चोप्राही होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. मात्र प्रियंका आणि हरमनची लव्ह स्टोरी चांगलीच गाजली. हरमनचे अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबत अफेअर होते. दोघांचे नातं तब्बल दोन वर्षे टिकलं. पण नंतर दोघे वेगळे झाले. अनेक वर्षानंतर हरमनने याविषयीचं मौन सोडलं असून ब्रेकअपमागचं कारण सांगितलं.

हरमन आणि प्रियंकाची मैत्री 2008मध्ये 'लव्ह स्टोरी २०५०’च्या सेटवर झाली होती. प्रियंकासोबत त्याची मैत्री चांगलीच बहरली. पुढे दोघेही एकमेकांच्या प्रेमातही पडले. अर्थात ‘वॉट्स यॉर राशी’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दोघांचेही ब्रेकअप झाले. एका मुलाखतीत हरमनने  प्रियांका आणि त्याच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

तो म्हणाला, 'त्यावेळी माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते त्यामुळे मी तणावाखाली होतो. मला माझं सगळं लक्ष चित्रपटांवर केंद्रित करायचं होतं. त्यामुळे मला प्रियंकाला वेळ द्यायला जमत नव्हतं.' 

पुढे तो म्हणाला, “लव्ह स्टोरी २०५०’ अपयशी ठरल्यानंतर मला ‘वॉट्स यूआर राशी’ हा सिनेमा मिळला. माझ्यावरचा दबाव वाढला होता. हा चित्रपट फ्लॉप होता कामा नये, हा माझा प्रयत्न होता. माझा संपूर्ण फोकस या चित्रपटावर होता.त्यातच चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही मला चित्रपटावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं होतं. प्रियांका मला त्या वेळी सतत वेळ देण्यास सांगत होती. पण मी वेळ देऊ शकत नव्हतो. यामुळेच आमच्यात मतभेद निर्माण झालेत आणि आम्ही वेगळे झालो,’ असे त्याने सांगितले.

15 वर्षांनंतर हरमन बावेजा हंसल मेहता यांच्या वेब सीरिजमधून कमबॅक करत आहे. हरमन बावेजा हा लोकप्रिय चित्रपट निर्माता हॅरी बावेजा यांचा मुलगा आहे. अभिनेता अनीस बज्मीच्या इट्स माय लाइफमध्ये शेवटचा काम करताना दिसला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर झी सिनेमावर प्रदर्शित झाला. हरमन बावेजा लवकरच 'स्कूप' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. 

Web Title: Actor harman baweja reveal the reason of breakup with priyanka chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.