असे आहे अभिनेता हर्षवर्धन राणेच्या स्वप्नातील घर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 05:19 PM2018-07-17T17:19:04+5:302018-07-17T17:29:53+5:30

हर्षवर्धन राणे झळकणार 'पलटन' चित्रपटात

Actor Harshavardhan Rane's dream house | असे आहे अभिनेता हर्षवर्धन राणेच्या स्वप्नातील घर

असे आहे अभिनेता हर्षवर्धन राणेच्या स्वप्नातील घर

googlenewsNext
ठळक मुद्दे हर्षवर्धनला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतित करायला खूप आवडते.हर्षवर्धन 'पलटन'नंतर जे.पी. दत्ता यांच्या आणखीन दोन चित्रपटात काम करणार आहे. 

'सनम तेरी कसम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारा अभिनेता हर्षवर्धन राणे जे.पी. दत्ता यांच्या 'पलटन' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रीकरणात व्यग्र नसताना हर्षवर्धनला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतित करायला खूप आवडते. त्यामुळे त्याने वसईच्या जवळपास निसर्गाच्या सान्निध्यात त्याच्या स्वप्नातील ट्री हाऊस बांधले आहे. 


हर्षवर्धनने शहरातील व्यस्त व गजबजाटापासून दूर राहण्यासाठी शांतता व हिरवळ असलेल्या ठिकाणी त्याचे ड्रीम होम बांधले आहे. याबाबत तो सांगतो की, 'निसर्गाच्या जवळ नेहमीच मला स्वातंत्र्य अनुभवता येते आणि कामासाठी नवीन उर्जा मिळते. मला बालपणापासून स्वतःचे ट्री हाऊस बनवण्याचे स्वप्न होते. एकदा मी मित्राच्या घरी गेलो होतो. त्यावेळी मला वाटले की इथे मी माझे स्वप्नातील घर बांधू शकतो. त्यानंतर मी तिथल्या काही मित्रांच्या मदतीने ट्री हाऊस बांधायला घेतले. काही दिवसांमध्ये हे घर बांधून पूर्ण होईल.' 
'पलटन' चित्रपट 1967 साली भारत व चीनमध्ये झालेल्या युद्धावर आधारीत आहे. या चित्रपटाचे चंदीगढमध्ये चित्रीकरण सुरू असताना हर्षवर्धनने शेतकऱ्यांसारखे जीवन व्यतित केले होते. त्याने तिथल्या गावात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांना मदत केली होती आणि गाई-म्हशींना चारा खाऊ घातला होता. तसेच या चित्रपटाच्या पोस्टर शूटसाठी हर्षवर्धन लंडनला गेला होता. तिथेदेखील लंडनमधील निसर्गाची मजा लुटण्यासाठी बाइकने फिरला होता. 
पलटन चित्रपटात हर्षवर्धनसोबत गुरमीत चौधरी, लव सिन्हा, सिद्धार्थ कपूर, जॅकी श्रॉफ, ईशा गुप्ता, सोनल चौहान, मोनिका गिल व दीपिका कक्कर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 
हर्षवर्धन 'पलटन'नंतर जे.पी. दत्ता यांच्या आणखीन दोन चित्रपटात काम करणार आहे. 

Web Title: Actor Harshavardhan Rane's dream house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.