ICUमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर होता अभिनेता हर्षवर्धन राणे, एका आठवड्यापूर्वी झाला होता कोरोना
By गीतांजली | Published: October 25, 2020 11:10 AM2020-10-25T11:10:18+5:302020-10-25T11:18:49+5:30
काही दिवसांपूर्वी अभिनेता हर्षवर्धन राणेने पण सोशल मीडियावरुन त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.
बॉलिवूडमधील बर्याच कलाकार गेल्या काही महिन्यांत कोरोना संक्रमित झाले होते. काही दिवसांपूर्वी अभिनेता हर्षवर्धन राणेने पण सोशल मीडियावरुन त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. कोरोना व्हायरसमुळे हर्षवर्धनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हर्षवर्धनने सांगितले की, मला 4 दिवस आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मला फार अशक्तपणा आला होता. हे सर्व डोकेदुखी आणि सौम्य तापानंतर सुरू झाले .जेव्हा 4 दिवस डोकं दुखण्याचे थांबली नाही, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं मला कळलं की हा नॉर्मल व्हायरस नाही आहे. माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली.
हर्षवर्धनचा आगामी सिनेमा 'तैश' रिलीजसाठी तयार आहे. तब्येत ठीक नसल्यामुळे हर्षवर्धन या सिनेमाचे प्रमोशन देखील करु शकलेला नाही. पुढे त्याने आपला आजार स्पष्ट केले की, ''डोकेदुखी आणि तापामुळे मला 2 दिवस विश्रांती मिळाली नाही तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो जिथे मला ताबडतोब आयसीयूमध्ये दाखल केले गेले.'' हर्षवर्धन सांगतो त्याची तब्येत बिगडल्यामुळे सिनेमाच्या टीमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 'तैश'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात हर्षवर्धन शिवाय पुल्कित सम्राट, कृति खरबंदा, संजीदा शेख आणि अमित साध यांच्या मुख्य भूमिका आहेत.