जॅक श्रॉफ 'बब्बर शेर' बनून वरुण धवनशी भिडणार! 'बेबी जॉन'चा नवीन प्रोमो पाहून अंगावर येईल काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 18:52 IST2024-10-12T18:51:39+5:302024-10-12T18:52:34+5:30
बेबी जॉन सिनेमातील जॅकी श्रॉफ यांचा खतरनाक लूक समोर आलाय (baby john, jackie shroff)

जॅक श्रॉफ 'बब्बर शेर' बनून वरुण धवनशी भिडणार! 'बेबी जॉन'चा नवीन प्रोमो पाहून अंगावर येईल काटा
सध्या वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन' सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. वरुण धवनचा वेगळाच लूक या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. आजवर कधीही न बघितलेला वरुण धवनचा डॅशिंग अंदाज या सिनेमातून बघायला मिळेल. 'जवान' फेम अॅटली या सिनेमाची निर्मिती करतोय. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. याशिवाय आज नुकतंच सिनेमात खलनायकी थाटात दिसणाऱ्या जॅकी श्रॉफ यांचा भन्नाट लूक रिव्हिल झालाय. आजवरचा बॉलिवूडमधील सर्वात खतरनाक व्हिलन या सिनेमातून दिसणार आहे.
'बेबी जॉन'मध्ये जॅकी श्रॉफ खलनायक
'बेबी जॉन' सिनेमातील जॅकी श्रॉफ यांची भूमिका असलेला खतरनाक अंदाज असलेला फर्स्ट लूकचा व्हिडीओ रिलीज झालाय. या व्हिडीओत जॅकी श्रॉफ जेलमध्ये असलेले पाहायला मिळत आहेत. तुरुंगात जॅकी यांचा वेगळाच दरारा बघायला मिळत. तुरुंगाच्या परिसरात जाळपोळ झाली असून जॅकी गुंड असूनही तिकडे राजासारखे वावरताना दिसतात. झुपकेदार मिशा, डोळ्यात आग असा जॅकी यांचा धडकी भरवणारा लूक पाहायला मिळतो. अल्पावधीत जॅकी यांचा हा लूक व्हायरल झालाय.
कधी रिलीज होणार बेबी जॉन?
'बेबी जॉन' सिनेमात वरुण धवन, किर्थी, वामिकासोबतच सिनेमात जॅकी श्रॉफ, राजपाल यादव हे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. थमन हा लोकप्रिय संगीतकार सिनेमाच्या संगीताची धूरा सांभाळणार आहे. मुराद खेतानी, ज्योती देशपांडे आणि प्रिया अॅटली या तिघांनी मिळून सिनेमाची निर्मिती केलीय. याशिवाय ए. कलीस्वरन हे सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळत आहेत. २५ डिसेंबर २०२४ ला ख्रिसमसच्या मुहुर्तावर हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होतोय. सिनेमाची जबरदस्त घोषणा आणि त्यात जॅकी श्रॉफ यांचा लूक पाहून आतापासूनच सर्वांना 'बेबी जॉन' पाहण्याची उत्सुकता लागली आहे.