कोरोना पॉझिटीव्ह असूनही रूग्णालयात नाही तर होम क्वारंटाईन झाले किरण कुमार; हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 05:45 PM2020-05-26T17:45:15+5:302020-05-26T17:48:42+5:30
दोन मजली इमारत असल्यामुळे रूमही जास्त आहेत. त्यामुळे स्वतःला क्वॉरंटाईन करून घेणे शक्य झाले.
कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षण दिसत नसले तरीही चाचणी केल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह आढळून येत आहे. यामुळे दिवसेंदिवस लोकांच्या मनात धडकी भरली आहे. लॉकडाऊन असून कोरोना रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. वैद्यकिय सुविधाही पुरेशा नाहीत. यामुळे अनेक रूग्णांंचे हाल होत आहेत. घरात पुरेशा सुविधा असल्यास अनेक रूग्णांना होम क्वॉरंटाईन करण्याकडे कल वाढला आहे.
रूग्णालयात न येता घरीच क्वॉरंटाईन राहून रूग्ण आपली जास्त काळजी घेवू शकतात. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह असल्यानंतरही किरण कुमार रुग्णालयात दाखल झाले नाहीत.मुळात किरण कुमार यांना कोणतीच कोरोनाची लक्षण आढळली नव्हती, तरीही कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांना धक्काच बसला. रूग्णालयावर आधीच भार वाढला आहे त्यांमुळेर त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे.
नित्यनियमाप्रमाणे किरण कुमार यांनी रेग्युलर चेकअप केले. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. बांद्रा परिसरात किरण कुमार यांचा मोठा बंगला आहे. डॉक्टरांच्या संपर्कातच राहून त्यांनी त्यांच्या घरातच स्वतःला बंदिस्त करून घेण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांच्याही संपर्कांत येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी एका रूमध्ये कोंडून घेतले आहे.
मुळात दोन मजली इमारत असल्यामुळे रूमही जास्त आहेत. त्यामुळे स्वतःला क्वॉरंटाईन करून घेणे शक्य झाले. कुटुंबीय देखील त्यांची योग्य प्रकारे काळजी घेत आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करून लवकरच बरा होईल असा विश्वासही त्यांना आहे.