"मी बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जात नाही कारण...", मनोज वाजपेयींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- "त्यांना वाटतं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:20 IST2024-12-17T11:17:01+5:302024-12-17T11:20:05+5:30
अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) बॉलिवूडमधील मोस्ट व्हर्सेटाइल कलाकारापैंकी एक आहेत.

"मी बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जात नाही कारण...", मनोज वाजपेयींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- "त्यांना वाटतं..."
Manoj Bajpayee : अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) बॉलिवूडमधील मोस्ट व्हर्सेटाइल कलाकारापैंकी एक आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या अभिनेत्याची जगभरात लोकप्रियता आहे. गेली अनेक दशकं ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मनोद वाजपेयींनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत जवळपास १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय ओटीटीवर अभिनेत्याचा बोलबाला आहे. असं असतानाही मनोज वाजपेयीबॉलिवूड पार्ट्यांमध्ये जाणं टाळतात. याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे.
'डियर मी स्क्रीन्स'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये मनोज वाजपेयी यांनी सांगितलं की त्यांना बॉलिवूड पार्ट्यांमध्ये आमंत्रित केलं जात नाही. याचं कारण सांगताना ते म्हणाले, "माझं काही कोणाशी वैर नाही, पण मी कुठल्याही पार्टीत सहभाही होत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोक आता मला बोलवतही नाही, कारण त्यांनी माहित झालंय की मी काही पार्ट्यांमध्ये जात नाही आणि त्यामुळे आमंत्रित करून आपण स्वत: चा अपमान का करून घ्यायचा? असं त्यांना वाटतं. परंतु या सगळ्यात मी खूश आहे. कृपया मला पार्ट्यांना बोलावू नका, कारण मला रात्री १० ते १०.३० पर्यंत झोपायला जायचं असतं आणि आणि मला सकाळी लवकर उठायला आवडतं."
पुढे अभिनेते म्हणाले, "हो, मी कधी कधी माझ्या जवळच्या काही लोकांना भेटतो. इँडस्ट्रीत माझे काही मोजकेच मित्र आहेत. शारीब हाशमी त्यापैकीच एक आहे. माझ्या मनात के के मेनन यांच्याविषयी खूप आदर आहे, तसेच नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा सुद्धा मी आदर करतो. पण आम्ही एकमेकांना फारसा वेळ देऊ शकत नाही, कारण आम्ही सगळेच आपापल्या कामात खूप व्यस्त असतो."
लोकांची चुकीची धारणा
मनोज वाजपेयी यांनी याबद्दल बोलताना सांगितले, "ज्या लोकांना वाटतं की मी खूप उद्धट आहे. तर त्यांना तसं वाटू शकतं. कारण मी फारसा कोणाशी बोलत नाही. मी खूपच कमी बोलतो. ज्यावेळी ते लोक मला प्रत्यक्ष भेटतील माझ्यासोबत संवाद साधतील तेव्हा त्यांना कळेल मी कसा आहे. त्या दिवशी त्यांच्या मनातील गैरसमज दूर होतील. खरं सांगायचं झालं तर मी उद्धट नाही, पण माझ्यात स्वाभिमान नक्की आहे."