नेपोटिज्म असतानाही नवाज-इरफानसारखे आउटसाइडर्स स्टार कसे झाले? मनोज वाजपेयीने दिलं उत्तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 04:58 PM2020-08-20T16:58:10+5:302020-08-20T17:01:09+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकी, मनोज वाजपेयी आणि इरफान खानसारखे आउटसाइडर्स इतके लोकप्रिय स्टार्स कसे बनले? नुकतंच मनोज वाजपेयी यांनी या प्रश्नाचं उत्तरही देऊन टाकलंय.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिज्म, आउटसाइडर्स आणि इनससाइडर्स अशा विषयांवरील चर्चा फारच तापली आहे. काही लोकांना असाही प्रश्न पडतो आहे की, जर आउटसाइडर्सना इंडस्ट्रीमध्ये कनेक्शन्सच्या माध्यमातून काम मिळतं. मग नवाजुद्दीन सिद्दीकी, मनोज वाजपेयी आणि इरफान खानसारखे आउटसाइडर्स इतके लोकप्रिय स्टार्स कसे बनले? नुकतंच मनोज वाजपेयी यांनी या प्रश्नाचं उत्तरही देऊन टाकलंय.
मनोज वाजपेयींनी याबाबत सांगितले की, 'प्रत्येकालाच माहीत आहे की, या प्रश्नाचं महत्व काय आहे. मनोज वाजपेयी आणि इतर ज्याही कलाकारांची नावे घेतली जात आहेत या सर्वांचा प्रवास फार विलक्षण राहिलाय. आम्हाला स्वत:ला विश्वास बसत नाही की, आम्ही कसा वेळ घालवला. हा प्रवास कोणत्याही अॅंगलने सोपा म्हटला जाऊ शकत नाही. जेवढ्याही सिनेमाचा आम्ही भाग राहिलो, ते सिनेमे बनवण्यासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागला. हे तुम्हीही विसरू नका'.
दरम्यान, मनोज वाजपेयी हे १९९६ मध्ये आलेल्या 'बॅंडीट क्वीन' सिनेमात एका छोट्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर त्यांनी काही वर्षांच्या संघर्षानंतर १९९९ मध्ये 'सत्या' सिनेमात रोल मिळवला होता. या सिनेमातील भीखू म्हात्रेच्या रोलने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. पण त्यानंतरही काम मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच होता.
साधारण एक दशकानंतर २०१२ मध्ये आलेल्या 'गॅंग्स ऑफ वासेपुर'मधून मनोज वाजपेयी यांना मोठं यश मिळालं. मनोज वाजपेयी आता ऑफबीट सिनेमांसोबतच कमर्शिअल सिनेमातही काम करताना दिसतात. तसेच वेबसीरीजमध्येही दिसतात. तरी सुद्धा त्यांच्या प्रतिभेनुसार हवं तसं काम मिळताना दिसत नाही.
हे पण वाचा :
डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं दाखवली 'औकात', कंगना रानौतने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा
कंगना रानौतचा नसीरूद्दीन शाह यांना टोमणा, 'इतक्या महान कलाकाराच्या शिव्याही प्रसादासारख्या'!