PM Narendra Modi : मनोज जोशी बनणार ‘अमित शहा’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:26 PM2019-02-13T12:26:32+5:302019-02-13T12:28:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाची जय्यत तयारी सुरू असताना आता एक ताजी बातमी आहे. होय, चित्रपटात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची व्यक्तिरेखा अभिनेते मनोज जोशी साकारणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाची जय्यत तयारी सुरू असताना आता एक ताजी बातमी आहे. होय, चित्रपटात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची व्यक्तिरेखा अभिनेते मनोज जोशी साकारणार आहेत.
मनोज जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. अमित शहा यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळावी, याचा मला आनंद आहे. मला या भूमिकेसाठी विचारणा झाली आणि मी क्षणाचाही विचार न करता, होकार कळवला आणि लगेच अभ्यासाला लागतो. या भूमिकेसाठी मी बराच अभ्यास केलाय, असे त्यांनी सांगितले. मनोज जोशी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी गुजराती चित्रपटांत व मालिकांत काम केले आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय हा या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत आहे. ओमांग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. ओमांग कुमार यांनी यापूर्वी मेरी कोम, सरबजीत,भूमी यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Well-known theatre and film actor Manoj Joshi to portray #AmitShah in #PMNarendraModi... Vivek Anand Oberoi essays the title role... Omung Kumar B directs the biopic... Produced by Suresh Oberoi and Sandip Ssingh... Here's the first look: pic.twitter.com/9M3n78q4XG
— taran adarsh (@taran_adarsh) February 13, 2019
गुजरातच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर चित्रपटाचे शूटींग होणार आहे. विवेक ओबेरॉय, मनोज जोशी यांच्याशिवाय बोमन इराणी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता, जरीना वहाब हे सगळे यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. अभिनेत्री बरखा बिष्ट नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांची व्यक्तिरेखा जिवंत करणार आहे.
Vivek Anand Oberoi [Vivek Oberoi] to star in Narendra Modi biopic, titled #PMNarendraModi... The first look poster was launched in 23 languages by Maharashtra CM Devendra Fadnavis... Directed by Omung Kumar... Produced by Suresh Oberoi and Sandip Ssingh. pic.twitter.com/K0HdjhFVtj
— taran adarsh (@taran_adarsh) January 7, 2019
‘पीएम नरेंद्र मोदी’ हा २३ भाषांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरणार आहे. एखाद्या पंतप्रधानांची कारकीर्द सुरू असताना त्यांच्यावर चित्रपट बनणे हा इतिहासही या चित्रपटाने रचला आहे. जुलै- आॅगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे.