सोनम वांगचुकच्या Boycott Chinese Products मोहिमेला मिलिंद सोमणची साथ, TikTok अकाऊंटपासून केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 10:15 AM2020-05-30T10:15:58+5:302020-05-30T10:25:18+5:30

मिलिंदने आपले टिक-टॉक अकाऊंट डिलीट केले आहे.

Actor milind soman uninstalls his tiktok account gda | सोनम वांगचुकच्या Boycott Chinese Products मोहिमेला मिलिंद सोमणची साथ, TikTok अकाऊंटपासून केली सुरुवात

सोनम वांगचुकच्या Boycott Chinese Products मोहिमेला मिलिंद सोमणची साथ, TikTok अकाऊंटपासून केली सुरुवात

googlenewsNext

अभिनेता मिलिंद सोमण सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो त्याला टिक-टॉकवर प्रचंड फोलॉर्वस आहेत. मिलिंदने आपले टिक-टॉक अकाऊंट डिलीट केले आहे. मिलिंदने ट्विटरवर प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा Boycott Chinese Products हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर Boycott Chinese Products ही मोहीम सुरु केली आहे. भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास सर्वातं आधी चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले  आहे. मिलिंद हा तरुणांचा रोल मॉडल आहे. त्यामुळे त्याचे अनुकरण अनेकजण करतील अशी आशा आहे.

सध्या भारत आणि चीनच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशात जर आपल्याला आर्थिक कणा मोडायचा असेल तर चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकणे फार गरजेचे आहे असे सोनम वांगचुक यांचे मतं आहे. भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी म्हणजेच बुलेट्सने उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळूरूबरोबरच देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला पाकिटातून म्हणजेच वॉलेटच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे असं मत वांगचुक यांनी व्यक्त केलं आहे. सध्या भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचे वांगचुक यांनी लेह-लडाखमधील एका निर्जन ठिकाणी बसून विस्तृत विश्लेषण केलं आहे.

Web Title: Actor milind soman uninstalls his tiktok account gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.