Nayanthara-Vignesh Shivan Surrogacy: सरोगसीप्रकरणी नयनतारा व विग्नेश यांना क्लिनचीट, जाणून घ्या काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:19 AM2022-10-27T11:19:22+5:302022-10-27T11:19:51+5:30
Nayanthara-Vignesh Shivan Surrogacy: साऊथ सुपरस्टार नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी जून महिन्यात लग्नगाठ बांधली होती आणि लग्नानंतर चारच महिन्यांत या कपलनं जुळ्या मुलांच्या जन्माची गोड बातमी शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
Nayanthara-Vignesh Shivan Surrogacy: साऊथ सुपरस्टार नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी जून महिन्यात लग्नगाठ बांधली होती आणि लग्नानंतर चारच महिन्यांत या कपलनं जुळ्या मुलांच्या जन्माची गोड बातमी शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. जूनमध्ये लग्न आणि ऑक्टोबरमध्ये जुळ्या मुलांचा जन्म हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेर सरोगसीद्वारे नयनतारा व विग्नेश आईबाबा झाल्याचं स्पष्ट झालं होतं. पण हे प्रकरण इथेच संपलं नव्हतं. सरोगसी कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपामुळे नयनतारा व विग्नेश यांची सरकारी चौकशी सुरू झाली होती. तर आता याचबद्दल महत्त्वाचं अपडेट आलं आहे. तामिळनाडू सरकारने या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली असून नयनतारा व विग्नेश यांना सरोगसीप्रकरणी क्लिनचीट दिली आहे.
भारतात जानेवारी 2022 पासून सरोगसीबाबत विशिष्ट कायदा करण्यात आला आहे. नयनतारा व विग्नेश यांनी या कायद्याचं उल्लंघन केल्याच्या संशयावरून त्यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पण या कपलने सहा वर्षापूर्वीच लग्न झाल्याचा दावा करत, तसे कागदोपत्री पुरावे सरकार दरबारी सादर केले आणि हे प्रकरण निवळलं होतं. आता तामिळनाडूनच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या तीन सदस्यीय समितीने नयनतारा व विग्नेश यांना क्लिनचीट दिली आहे. स्टार कपलने कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. सरोगसीसाठी कुठल्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब केला नाही, असं समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. अर्थात या अहवालात सरोगसी प्रक्रिया करणाऱ्या रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे.
रूग्णालयाने केला निष्काळजीपणा
द न्यूज मिनिटने दिलेल्या वृत्तानुसार, समितीने नयनतारा व विग्नेश या स्टार कपलची सरोगसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या रूग्णालयावर ठपका ठेवला आहे. नयनतारा व विग्नेशच्या फॅमिली डॉक्टरमुळे सगळा गोंधळ झाला. डॉक्टरांनी रेकमेंडेशन लेटर 2020 मध्ये दिलं होतं आणि याआधारे ट्रिटमेंट करण्यात आली होती, असं चौकशीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, सरोगेट मदरने कपलसोबत नोव्हेंबर 2021 मध्ये करार केला होता. मार्च 2022 मध्ये आई बनण्याची प्रक्रिया सुरू झाली. यानंतर ऑक्टोबरमध्ये नयनतारा व विग्नेश यांच्या जुळ्या मुलांचा जन्म झाला. या टाईमलाईननुसार, नयनतारा व विग्नेशने सरोगसीची मदत घेतली, तेव्हा ही प्रक्रिया कायदेशीर होती. कारण भारतात जानेवारी 2022 मध्ये कमर्शिअल सरोगसीवर बंदी लादण्यात आली.