​अभिनेता नव्हे नेताच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2016 07:51 AM2016-03-11T07:51:22+5:302016-03-11T00:51:22+5:30

काल-परवापर्यंत अनुपम खेर यांची ओळख ही बॉलिवूडचा प्रतिभावंत अभिनेता अशी होती. परंतु आता ते पक्के नेता बनले आहेत. दिवसागणिक ...

Actor not the leader! | ​अभिनेता नव्हे नेताच!

​अभिनेता नव्हे नेताच!

googlenewsNext
ल-परवापर्यंत अनुपम खेर यांची ओळख ही बॉलिवूडचा प्रतिभावंत अभिनेता अशी होती. परंतु आता ते पक्के नेता बनले आहेत. दिवसागणिक येणारी त्यांची विधाने नवनवीन वादाला जन्म घालीत आहेत. नुकतेच ते कोलकात्यात गरजले. येथे ते राजकीय नेताच्या भूमिकेत, कें द्रीय सत्तेच्या विरोेधकांवर वार करीत होेते. 
जेव्हापासून केंद्रात नवे सरकार आले आहे, तेव्हा पासून अनुपम खेर यांची लाईफ स्टाईल ३६० डिग्री टर्न झाली आहे. एकेकाळी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे समर्थक राहिलेले अनुपम खेर हे यावेळी सत्ताधारी सरकारच्या कट्टर समर्थकांमध्ये आपली ओळख बनविण्यात यशस्वी झाले आहेत. या सरकारच्या बचावात अनुपम खेर यांनी सहनशीलतेच्या मुद्यावरून दिल्लीत मोर्चा काढला. त्यांना लगेच पद्मश्री मिळाले. याच दरम्यान पाकिस्तानासाठी त्यांना व्हीजा न मिळाल्याचा मुद्दादेखील बरेच दिवस तापला. याच वादाच्या दरम्यान अनुपम खेर यांनी नंदिता दासला पाकिस्तानची प्रवक्ता संबोधले होते. कारण अनुपम खेर यांच्या तर्कासोबत सहमत नव्हती. सहनशीलतेच्या मुद्यावरून ते शाहरुख खानच्या बचावात पुढे आले तर आमिर खानच्या विरोधात भूमिका घेतली. पुणे इंस्टिट्यूटमध्ये गजेंद्र सिंहच्या  नियुक्ती वरून ते कधी सरकारच्या पक्षात, तर कधी विद्यार्थ्यांच्या समर्थनात दिसले. 
अनुपम खेर यांचा भूतकाळ पाहिला तर, ते नेहमी वादात राहिलेले दिसतील. काही वर्षांपूर्वी अनुपम खेर त्यावेळी वादात आले होते, जेव्हा एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री ममता कुलकर्णीची बहीण मिथिलेश सोबत त्यांच्यावर छेडखानीचा आरोप लावण्यात आला होता. यूपीए सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना जेव्हा सेंसॉर बोर्डचे चेअरमन पदावरून हटविण्यात आले होते, तर त्यांनी डाव्या पक्षांना जबाबदार मानून सरकारवर टीका केली होती. 
अभिनेता इरफान खान सोबत त्यांचा एका चित्रपटावरून आमना-सामना देखील झाला आहे. ‘गांधी टू हिटलर’ या चित्रपटाच्या वादावरूनदेखील अनुपम खेर चर्चेत राहिले होते. वाद हा होता की, अनुपम खेर यांनी  आधी या चित्रपटात काम करण्यासाठी सहमती दर्शविली होेती आणि त्याबदल्यात अ‍ॅडव्हांस ४ लाख रुपये घेतले होेते. नंतर त्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि घेतलेले अ‍ॅडव्हांस परतही केले नाही.  आताचा विशाल भारद्वाजचा चित्रपट ‘हैदर’ ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा अनुपम यांनी विशाल भारद्वाजवर टीका केली होती. 

Web Title: Actor not the leader!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.