अभिनेता आर. माधवनच्या मुलानं पटकावले ७ राष्ट्रीय पुरस्कार; युजर्स म्हणाले, याला म्हणतात संस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 03:55 PM2021-10-27T15:55:48+5:302021-10-27T16:00:25+5:30
आर माधवनच्या मुलाचं नाव वेदांत माधवन आहे. वेदांतनं केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या आईवडिलांसह देशाचं नाव उज्ज्वल झालं आहे.
मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यनला(Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानं चांगलाच चर्चेत आला आहे. नेटिझन्स आर्यन खान, शाहरुख खान यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आर माधवन यांच्या मुलानं राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यामुळे सोशल मीडियात त्याचं प्रचंड कौतुक करत आहे.
आर माधवन(R Madhvan) नेहमी सोशल मीडिया सक्रीय असतो. अलीकडेच माधवनने त्याच्या मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यावर लोकांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. आर माधवनच्या मुलाचं नाव वेदांत माधवन आहे. वेदांतनं केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या आईवडिलांसह देशाचं नाव उज्ज्वल झालं आहे. वेदांतने स्विमिंगमध्ये ७ नॅशनल पुरस्कार त्याच्या नावावर केले आहेत. त्यानंतर आर माधवन आणि वेदांतला अनेक चाहते शुभेच्छा देत त्याचं अभिनंदन करत आहेत.
बंगळुरूत झालेल्या ४७ व्या ज्युनिअर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने ७ पुरस्कार जिंकले आहेत. त्यात ४ सिल्व्हर मेडल तर ३ ब्राँन्झ मेडल आहेत. रिपोर्टनुसार, वेदांतनं ८०० मी. फ्रिस्टाइल स्विमिंग, १५०० मीटर फ्रि स्टाइल स्विमिंग, ४*10 मीटर फ्रि स्टाइल स्विमिंग आणि ४*२०० मीटर फ्रिस्टाईल स्विमिंगमध्ये सिल्व्हर मेडल तर १००, २०० आणि ४०० मीटर फ्रिस्टाईल स्विमिंगमध्ये त्याला कास्य पदक मिळालं आहे.
वेदांत माधवन यांच्या कामगिरीचं सोशल मीडियात कौतुक होत आहे. राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी वेदांतच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. गुड जॉब वेदांत, आम्हाला तुझा अभिमान आहे अशा शब्दात कौतुक केले आहे. सोशल मीडियात युजर्सकडून वेदांत माधवनची तुलना शाहरुखचा मुलगा आर्यन खानशी होत आहे. एकीकडे आर्यन खान जेलमध्ये आहे तर वेदांत राष्ट्रीय पुरस्कार मिळवत आहे. एक देशासाठी पदकं मिळवतोय तर दुसरा ड्रग्जच्या आहारी गेला आहे. याला संस्कार म्हणतात असं युजर्स म्हणत आहेत.
मी भाग्यवान वडील – माधवन
अभिनेता आर माधवननं वेदांतच्या बर्थ डेवर एक मेसेज शेअर केला होता. मुलाबाबत माधवन म्हणतात की, मी ज्या गोष्टींमध्ये पुढे होतो त्या गोष्टींमध्ये मला मागे टाकल्याबद्दल धन्यवाद. माझी छाती गर्वाने फुगते. मी तुझ्याकडून खूप काही शिकतो. १६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू चांगला माणूस बनशील ही माझी अपेक्षा आहे. मी भाग्यवान वडील आहे अशा भावना माधवननं व्यक्त केल्या आहेत.