सुप्रसिद्ध अभिनेता २० वर्षांपासून गायब, आता सलमानची Ex गर्लफ्रेंड घेतेय शोध! माहिती देणाऱ्यास मिळणार बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 03:40 PM2024-09-06T15:40:48+5:302024-09-06T15:41:52+5:30

गेल्या २० वर्षांपासून अचानक गायब झालेल्या अभिनेत्याच्या शोधासाठी आता सलमानची एक्स गर्लफ्रेंड पुढे आली आहे

Actor raj kiran disappeared last 20 years but salman khan ex girlfriend somy ali try to find him | सुप्रसिद्ध अभिनेता २० वर्षांपासून गायब, आता सलमानची Ex गर्लफ्रेंड घेतेय शोध! माहिती देणाऱ्यास मिळणार बक्षीस

सुप्रसिद्ध अभिनेता २० वर्षांपासून गायब, आता सलमानची Ex गर्लफ्रेंड घेतेय शोध! माहिती देणाऱ्यास मिळणार बक्षीस

बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत वरुन सर्व चांगलं दिसत असलं तरी अनेकदा आतमध्ये अज्ञात दुःख लपली असतात. या दुःखाची जाणीव अनेकांना कधीकधी होत नाही. सध्या अशीच एक घटना समोर येतेय. २० वर्षांपासून बॉलिवूडमधील एक अभिनेता गायब आहे. त्यामुळे आता सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियावर सर्वांना आवाहन केलंय की, जो कोणी अभिनेत्याला सुखरुप शोधून आणेल त्याला बक्षीस जाहीर करण्यात येईल. ९० हून जास्त सिनेमात काम करुन अचानक गायब झालेला हा अभिनेता आहे राज किरण.

राज किरण गेल्या २० वर्षांपासून गायब

'अर्थ', 'शिक्षा', 'राजतिलक' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये अभिनय केलेले कलाकार म्हणजे राज किरण. करिअरच्या शिखरावर असताना राज किरण एकाएकी इंडस्ट्रीतून गायब झाले. आता सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने त्यांना शोधून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी तिने आईकडून घेतले, शिवाय स्वतःचे पैसेही वापरले. परंतु राज किरण अजूनही सापडले नाहीत. तरीही सोमी यांची आशा कायम आहे. त्यांनी नुकतंच सोशल मीडियावर राज किरण यांना शोधून आणण्याऱ्याला बक्षीस जाहीर केलंय. 


सोमी अली यांचं सर्वांना आवाहन

सोमी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितलंय की, "कोणीही मला राज किरण यांच्याबद्दलची विश्वासार्ह्य माहिती आणून देईल त्यांना मी बक्षीस देईल. मी ऋषी कपूर यांना वचन दिलं होतं की, मी राज किरण यांचा तपास करणं थांबवणार नाही. राज किरण ठीक आहेत का? त्यांना कोणत्या मदतीची आवश्यकता तर नाही? हे फक्त मला जाणून घ्यायचंय. १७ वर्षांपासून माझी संस्था हे काम करत आहे. कृपया तुम्हा कोणाला काही समजलं तर मला सांगा." अशाप्रकारे सोमी यांनी पोस्ट केलीय. 

Web Title: Actor raj kiran disappeared last 20 years but salman khan ex girlfriend somy ali try to find him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.