250 रुपये होती पहिली सॅलरी, आज एका चित्रपटासाठी 70 कोटी वसूल करतो हा अॅक्टर! नाव जाणून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 01:01 PM2024-02-05T13:01:02+5:302024-02-05T13:01:45+5:30
...हिंदी चित्रपट सृष्टीतील असाच एक स्टार कलाकार आहे, ज्याची पहिली सॅलरी केवळ 250 रुपये होती. मात्र हा कलाकार आता एका चित्रपटासाठी तब्बल 70 कोटी रुपये घेतो.
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अॅक्टर अथवा कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात अत्यंत कमी पैशांपासून केली. मात्र, आज हे स्टार कलाकार आपली जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीतील असाच एक स्टार कलाकार आहे, ज्याची पहिली सॅलरी केवळ 250 रुपये होती. मात्र हा कलाकार आता एका चित्रपटासाठी तब्बल 70 कोटी रुपये घेतो. हा बॉलिवूड अॅक्टर दुसरा-तिसरा कुणी नसून कपूर घराण्यादील 'दीपक' आहे.
रणबीर कपूरने 2007 मध्ये आलेल्या 'सावरिया' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. इंडस्ट्रीमध्ये गेल्या 18 वर्षांहून अधिक काळापासून असलेल्या रणबीरची आज बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये गणना होते. 'बर्फी', 'संजू' आदी चित्रपटांतील अभिनयाने त्याने आपल्या चाहत्यांची मने जिंकण्यात कुठल्याही प्रकारची कसर सोडली नाही.
कधी मिळाची केवळ 250 रुपये सॅलरी -
रणबीर कपूरची पहिली सॅलरी केवळ 250 रुपये एवढी होती, हे फार कमी लोकांना माहीत असेल. याचा खुलासा खुद रनबीरनेच एका मुलाखतीत केला होता. रणबीरने त्याचे वडील ऋषी कपूर यांचा चित्रपट 'प्रेम ग्रंथ' मध्ये काम केले होते. यासाठी त्याला केवळ 250 रुपये मिळाले होते. या चित्रपटात त्याने डायरेक्टर राजीव कपूर यांना असिस्ट केले होते. 'प्रेम ग्रंथ' मध्ये असिस्टन्ट डायरेक्टर म्हणून काम करण्यासाठी अॅक्टरला 250 रुपये मिळाले होते. ही त्याची पहिली सॅलरी होती. यावेळी रणबीरने, आपही ही सॅलरी आईकडे दिली होती, असा खुलासाही केला होता.
आज एक चित्रपटासाठी वसूल करतो 70 कोटी रुपये -
कधी काळी 250 रुपये कमावणाऱ्या रणबीरचे नाव हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सर्वात श्रीमंतर अॅक्टरमध्ये घेतले जाते. त्याला नुकताच 'ॲनिमल' साठी 'बेस्ट अॅक्टर फिल्मफेअर' अवॉर्ड मिळाला आहे. यातच, एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, रणबीरने या चित्रपटासाठी तब्बल 70 कोटीर रुपये घेतले होते. इतर अॅक्टर्सच्या तुलनेत रणबीरची फीस अनेक पटिने अधिक असल्याचे दिसून आले होते.
रणबीर कपूरच्या नेटवर्थसंदर्भात बोलायचे झाल्यास, 'मिंट'नुसार, रणबीरची एकूण संपत्ती 345 कोटी रुपये आहे. याशिवाय रणबीर लवकरच 'रामायण' चित्रपटातही दिसून येणार आहे.