अभिनेता रणवीर शौरीला झाली कोरोनाची लागण, सध्या आहे होम क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 01:59 PM2021-02-17T13:59:15+5:302021-02-17T14:00:05+5:30
Actor Ranvir Shorey tests positive for COVID-19 : बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी याला कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या दोन चार दिवसात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोनाच्या विळख्यात सिनेइंडस्ट्रीतील बरेच कलाकार अडकले आहेत. दरम्यान, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी याला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरातच त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
अभिनेता रणवीर शौरीने ट्विट करत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. त्याने ट्विट केले की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या शरीरात कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. सध्या क्वारंटिनमध्ये माझ्यावर उपचार सुरु आहेत.
I have tested positive for #COVID19. Symptoms are mild. Am quarantining.
— Ranvir Shorey (@RanvirShorey) February 17, 2021
रणवीर शौरीच्या आधी बॉलिवूडमधील काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन, कनिका कपूर, मोरानी कुटुंब, नीतू कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, वरूण धवन, क्रिती सनॉन, रकुलप्रीत सिंग,तमन्ना भाटिया, तनाज करीम आणि हर्षवर्धन राणे या कलाकारांना कोरोना झाला होता.
आगामी प्रोजेक्ट...
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रणवीर शौरी लवकरच मेट्रो पार्क २मध्ये दिसणार आहे. नुकताच तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या लूटकेसमध्ये दिसले होते. याशिवाय इरफान खानसोबत अंग्रेजी मीडियममध्ये तो झळकला होता. त्याने रंगबाज, मेट्रो पार्कमध्ये काम केले होते. रंगबाजमधील त्याच्या भूमिकेची खूप चर्चा झाली होती.
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
मुंबईत कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर अनलाॅकचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, यापूर्वीच खबरदारी म्हणून पालिकेने मुंबईतील जम्बो कोविड केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एक महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. रविवारी ६४५, सोमवारी ४९३ रुग्ण आढळून आले होते. त्यात काहीशी घट झाली असून मंगळवारी कोरोनाचे ४६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.