'गरजच काय...?', बॉलिवूड अभिनेत्याने दुसऱ्या पत्नीचं केलं धर्मपरिवर्तन; नेटकरी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:26 IST2025-01-15T11:26:24+5:302025-01-15T11:26:31+5:30

अभिनेता ४८ वर्षांता असून त्याची दुसरी पत्नी २२ वर्षांची आहे.

actor sahil khan made his second wife milena alexandra to change religion netizens furious | 'गरजच काय...?', बॉलिवूड अभिनेत्याने दुसऱ्या पत्नीचं केलं धर्मपरिवर्तन; नेटकरी भडकले

'गरजच काय...?', बॉलिवूड अभिनेत्याने दुसऱ्या पत्नीचं केलं धर्मपरिवर्तन; नेटकरी भडकले

अभिनेता साहिल खानने (Sahil Khan) यावर्षीच परदेशी गर्लफ्रेंड मिलेना अलेक्जांड्रासोबत (Milena Alexandra) लग्न केलं. साहिल ४८ वर्षांचा असून मिलेना २२ वर्षांची आहे. दोघांनी युरोपमध्ये लग्नगाठ बांधली. आता काही महिन्यातच  मिलेनाने धर्मपरिवर्तन केलं असल्याचं समोर आलं आहे. यामुळे ४८ वर्षीय साहिलला  नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. 'हे करणं गरजेचं होतं का?' असा सवाल नेटकऱ्यांनी साहिलला विचारला आहे.

साहिलची पत्नी मिलेनाच्या धर्मपरिवर्तनावर आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. मिलेनाने इस्लाम धर्म कबूल केला आहे. मिलेना साहिल खानची दुसरी पत्नी आहे. ती युरोपातील बेलारुसची राहणारी आहे. साहिल खानने मिलेनाच्या धर्मपरिवर्तनाबद्दल जाहीर करत लिहिले, "माझी पत्नी मिलेना अलेक्जांड्राने इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. अल्लाहचं नाव घेत आम्ही सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहोत. अल्लाह आम्हाला माफ करा आणि आमची प्रार्थना स्वीकारा."


साहिर खानच्या या पोस्टवर युजर्सने कमेंट करत लिहिले,'"जर तुमचं एकमेकांवर खरं प्रेम आहे तर तिने धर्म बदलण्याची गरजच काय?','तुझं तिच्यावर खरं प्रेम असेल तर तूच ख्रिश्चन धर्म स्वीकारायला काय हरकत होती?','काहीही अध्ययन आणि शोध न घेता इस्लाम स्वीकारण्याचा काय फायदा? केवळ इस्लामच नाही तर फक्त लग्न करण्यासाठी धर्म स्वीकारण्याचा काय फायदा जर तुमच्या दोघांचं नातं घट्ट आहे.'

साहिल खानचं पहिलं लग्न अभिनेत्री निगार खानसोबत झालं होतं. २००३ मध्ये त्यांचा निकाह झाला तर दोन वर्षांनी २००५ त्यांचा तलाक झाला होता. साहिल खानने 'एक्सक्युज मी', 'स्टाईल', 'डबल क्रॉस, 'ये है जिंदगी' या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Web Title: actor sahil khan made his second wife milena alexandra to change religion netizens furious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.