सलमानमुळे वाचला दिया मिर्झाच्या आईचा जीव; थोडक्यात टळला होता अनर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 02:06 PM2023-11-09T14:06:36+5:302023-11-09T14:06:57+5:30

Salman khan: सलमानने केलेल्या मदतीमुळे दिया आजही त्याची ऋणी आहे.

actor-salman-khan-saved-dia-mirza-mother-life-know-story-here | सलमानमुळे वाचला दिया मिर्झाच्या आईचा जीव; थोडक्यात टळला होता अनर्थ

सलमानमुळे वाचला दिया मिर्झाच्या आईचा जीव; थोडक्यात टळला होता अनर्थ

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'टायगर 3' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच या सिनेमातील काही गाणी आणि ट्रेलर रिलीज झाले. विशेष म्हणजे सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहेत. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर नक्कीच सुपरहिट ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामध्येच सध्या सलमानविषयी अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. त्यात एकदा सलमानमुळे अभिनेत्री दिया मिर्झा (dia mirza) हिच्या आईचा जीव वाचला होता. ज्यामुळे आजही दिया सलमानची ऋणी असल्याचं सांगण्यात येतं.

सलमान इतरांना मदत करण्यासाठी कायम तत्पर असतो. त्यामुळे त्याच्या या दयाळू स्वभावाविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. आजवर त्याने सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना या ना त्या माध्यमातून मदत केली आहे. विशेष म्हणजे एकदा तर त्याने चक्क दिया मिर्झाच्या आईचा जीव वाचवला आहे.
दिया मिर्झाच्या आईचे सलमानने वाचवला जीव

एकदा दियाची आई अचानकपणे बेशुद्ध पडली. आईची झालेली ही अवस्था पाहून दिया गडबडून गेली आणि तिने ताबडतोब सलमानला फोन केला. सलमान दियाच्या घरापासून जवळ राहतो त्यामुळे तिने सलमानला फोन केला. दियाच्या एका फोनवर सलमान तिच्या घरी पोहोचला आणि त्याने लगेचच तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमीट केलं. 

जर दियाच्या आईला वेळीच उपचार मिळाले नसते तर त्यांचा जीव गेला असता. परंतु, सलमानने योग्यवेळी मदत केल्यामुळे होणारा अनर्थ टळला. हा किस्सा दियाने एका मुलाखतीमध्ये केला होता. दरम्यान, दियाने ट्विट करुनही सलमानचे आभार मानले होते. 'हा तो व्यक्ती आहे ज्याने माझ्या आईचा जीव वाचवला आहे', असं ट्विट दियाने केलं होतं.
 

Web Title: actor-salman-khan-saved-dia-mirza-mother-life-know-story-here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.