Sandeep Nahar Suicide: कोण होता संदीप नाहर? आत्महत्या केल्याचं कळताच काय म्हणाला संदीपचा मित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 01:35 AM2021-02-16T01:35:21+5:302021-02-16T07:09:01+5:30
Co-star in 'MS Dhoni' Sandeep Nahar Suicide: अभिनेता सुशांतसिंह राजपूतसह Sushant Singh Rajput काम केलेल्या संदीप नाहरने केली आत्महत्या.
बॉलीवूड Bollywood अभिनेता संदीप नाहर Sandeep Nahar यानं त्याच्या मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली आहे. संदीप नाहर यानं याआधी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) "धोनी: द अनटोल्ड स्टोरी" (M.S. Dhoni: The Untold Story) या चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय त्यानं अभिनेता अक्षय कुमारच्या 'केसरी' (kesari) या चित्रपटातही महत्वाची भूमिका साकारली होती. (Actor Sandeep Nahar Found Dead After Posting Video Suicide Note)
एमएस धोनी, केसरी सिनेमात काम केलेल्या अभिनेता संदीप नाहरची आत्महत्या
संदीपनं आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या फेसबुक अकाऊंटवर सुसाइड नोट देखील लिहील्याचं आढळलं आहे. यात त्यानं कौटुंबिक आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्ट्रगलमुळे मानसिक तणावात असल्याचं म्हटलंय. यासोबत जीवन संपविण्याच्या त्याच्या या निर्णयाला पूर्णपणे स्वत: जबाबदार असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
कोण होता संदीप नाहर?
नीरज पांडे दिग्दर्शित "धोनी: द अनटोल्ड स्टोरी" चित्रपटात सुशांतसिंह राजपूत याच्या मित्राची म्हणजेच परमजित सिंग अर्थात छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. याच छोटू भैय्यानं धोनीला त्याची पहिली क्रिकेटची बॅट दिली होती. धोनीच्या आयुष्यावरील या चित्रपटातील भूमिकेनंतर संदीप नाहरने अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकाराची भूमिका केली. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेल्या 'केसरी' या चित्रपटात संदीप नाहरने भुट्टा सिंग नावाची सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. संदीप नाहरचा हाच शेवटचा चित्रपट ठरला आहे. संदीप नाहर हा मूळचा चंदीगढचा असून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आला होता.
संदीप नाहर नेहमी आनंदी असायचा
"संदीपचं व्यक्तीमत्व अतिशय आनंदी स्वरुपाचं होतं. वैयक्तीक अडचणी मित्रांसोबत त्यानं कधीच शेअर केल्या नाहीत", असं संदीपच्या चंदीगढमधील बलजित नावाच्या मित्रानं सांगितलं. इंडिया डॉट कॉमनं बलजित याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी तो बोलत होता. संदीपनं आत्महत्या केल्याचं कळालं आणि धक्काच बसल्याचं तो म्हणाला. याशिवाय संदीपशी अनेकदा फोनवर बोलणं व्हायचं. आम्ही चांगले संपर्कात होतो. पण तो इतक्या कठीण काळातून जातोय हे मला त्यानं कळूच दिलं नाही, असंही बलजित म्हणाला.
जगासमोर नेहमी आनंदी आणि मजबूत राहण्याचा स्वभाव असल्यानं आपण कधीच वैयक्तिक अडचणी मित्रमंडळींसोबत शेअर केल्या नाहीत, असं संदीपनंही त्याच्या सुसाइट नोटमध्ये नमूद केलं आहे.