Actor Sarath Babu Death: साऊथ सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांचं निधन, ७१ व्या वर्षी घेतला अखेरच्या श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 04:39 PM2023-05-22T16:39:38+5:302023-05-22T16:43:04+5:30
अभिनेत्याच्या निधनाच्या बातमी ऐकून चाहत्यांना आणि मित्रांना धक्का बसलाय.
Actor Sarath Babu Death: साऊथ चित्रपटसृष्टीतून दु:खद बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात महिनाभराहून अधिक काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि त्याच्या अवयवांनी काम करणे बंद केले आणि दुपारी त्यांचं निधन झाला. दिग्गज अभिनेत्याच्या निधनाच्या बातमी आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना आणि मित्रांना धक्का बसलाय, दक्षिण इंडस्ट्रीतही शोककळा पसरली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरथ यांच्या प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. याआधीही त्यांच्या निधनाची बातमी
आली होती, मात्र कुटुंबीयांनी हे वृत्त फेटाळून लावले आणि सरथ बाबूंवर उपचार सुरू असून ते जिवंत असल्याचे सांगितले. त्यावेळी खोट्या बातम्या पसरवू नका, असे आवाहनही अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी केले होते. पण आज अखेर त्यांच्या प्राणज्योत मालवली आहे.
सरथ बाबू यांनी 1973 मध्ये तेलुगू चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. सरथ बाबू यांचं खरं नाव सत्यम बाबू दीक्षितुलु होते. ते तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जातात. त्यांना नऊ वेळा सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा नंदी पुरस्कार मिळाला आहे.