‘राधे’ चित्रपटाच्या सेटवरून ‘या’ अभिनेत्याने शेअर केला सेल्फी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 17:20 IST2020-03-08T17:19:44+5:302020-03-08T17:20:26+5:30
त्याने हा सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात तो समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी झालेली दुखापत आता बरी होत असल्याचे तो सांगतो आहे.

‘राधे’ चित्रपटाच्या सेटवरून ‘या’ अभिनेत्याने शेअर केला सेल्फी !
सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘राधे’ सध्या वेगवेगळया कारणांमुळे चर्चेत आहे. आता हा चित्रपट पुन्हा चर्चेत आलाय. तो म्हणजे अभिनेता रणदीप हुडाने पोस्ट केलेल्या सेल्फीमुळे. त्याने हा सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात तो समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी झालेली दुखापत आता बरी होत असल्याचे तो सांगतो आहे.
रणदीप हुडा हा असा अभिनेता आहे की, जो त्याला मिळालेल्या प्रोजेक्टवर अगदी मनापासून काम करतो. त्या भूमिके साठी मेहनत घेतो. आता सध्या तो ‘राधे’ या चित्रपटाच्या बाबतीत खुप उत्सुक आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली होती. आता ती दुखापत बरी होतेय हे त्याने फोटोच्या कॅप्शनवरून सांगितले. त्याच्या पोस्टवर एका युजरने सांगितले,‘वेळेनुसार हे बरे होऊन जाईल.’ तर दुसऱ्याने सांगितले,‘ जखमा या आपल्याला आपल्यात क्षमता वाढवण्याची गरज आहे, हेच सुचित करत असतात.’
रणदीप हुडा आणि दिशा पटानी ‘राधे’ चित्रपटाची शूटिंग थायलंडमध्ये होणार होती. पण, कोरोना व्हायरसमुळे ही शूटिंग रद्द करण्यात आली आहे. आता मुंबईत या चित्रपटाचे शूटिंग होणार असल्याचे कळतेय.