अभिनेत्री सोनल चौहानचा रॉयल लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 04:53 PM2018-08-08T16:53:48+5:302018-08-08T16:58:17+5:30

'पलटन' चित्रपट 1967 साली झालेल्या भारत व चीन युद्धावर आधारीत आहे.

Actor Sonal Chauhan's Royal Look | अभिनेत्री सोनल चौहानचा रॉयल लूक

अभिनेत्री सोनल चौहानचा रॉयल लूक

googlenewsNext
ठळक मुद्देसोनल तब्बल पाच वर्षानंतर झळकणार हिंदी रुपेरी पडद्यावरसोनलचा रॉयल लूक

२००८ साली 'जन्नत' चित्रपटातून अभिनेत्री सोनल चौहानने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. यात तिने साकारलेली झोया माथुर प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर हिंदीमध्ये २०१३ साली 'थ्रीजी'मध्ये झळकल्यानंतर आता ती तब्बल पाच वर्षानंतर हिंदी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. जे.पी.दत्ता यांच्या पलटन सिनेमात ती दिसणार आहे. या चित्रपटात ती वेगळ्याच भूमिेकेत दिसणार आहे. 'पलटन' चित्रपटाची कथा भारत व चीन युद्धावर आधारीत आहे. हा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचे खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी ११ सप्टेंबरला सिक्कीम सीमेवर भारत-चीन युद्ध सुरू झाले होते. त्याच आठवड्यात ७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सोनल चौहान पलटनमध्ये राजपूत घराण्यातील महिलेची भूमिका करणार असून यात तिचा रॉयल लूक पाहायला मिळणार आहे. तिने चित्रपटातील लूकबद्दल सांगितले की, मी खऱ्या आयुष्यातही अशीच आहे. त्यामुळे ही भूमिका मला खूप जवळची वाटली. पलटन हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. त्यामुळे पात्र जितके वास्तविक वाटेल यासाठी प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या लूकटेस्टवेळी टीमने राजस्थानच्या राणीच्या लूकचा संदर्भ घेतला होता. 
'पलटन' चित्रपट 1967 साली झालेल्या भारत व चीन युद्धावर आधारीत आहे. जे. पी. दत्ता पुन्हा एकदा देशाचा इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या या चित्रपटात सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, सोनू सूद, गुरमीत चौधरी, हर्षवर्धन राणे, सिद्धार्थ कपूर, लव सिन्हा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री ईशा गुप्तादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


 

Web Title: Actor Sonal Chauhan's Royal Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.